मोहरणा येथे काही महिन्यांपासून अवैध देशी-विदेशी दारू विक्री केली जात होती. त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. भांडण-तंटे होत असून, महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराने त्रस्त महिला एकत्र आल्या. त्यांनी गवराळा व डांभेविरली महिलांचा आदर्श घेत आपल्या गावातही दारूबंदीसाठी पदर खोचला. बुधवारी महिलांनी गावात रॅली काढून दारुबंदीसाठी जनजागृती केली. यावेळी रिना चौधरी, त्रिशीला उके, प्रभा भानारकार, सुनीता गजघाटे, बेबी मेश्राम, सरिता देसाई, लता कुत्तरमारे, कांता लांडगे, शारदा नागोसे, गीता बोरकर, सुद्धामता मेश्राम, इंदिरा बगमारे, चित्रा मेश्राम, प्रांजली भानरकार, साजन वकेकर, सुनीता मेंढे, संजना बगमरे, शीतल नागोसे, आशा चौधरी, चारुशीला गायकवाड, शारदा बाविस्कर, शारदा नखाते, साधना नागोसे, मंजू भानारकर, प्रगती पिल्लेवाण यांसह महिला उपस्थित होत्या.
दारूबंदी समितीचे गठण
गावात संपूर्ण दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला असून, आता दारुबंदी समितीची स्थापनाही करण्यात आली. बुधवारी रॅलीनंतर महिलांनी एकत्र येत ही समिती स्थापन केली. गावातील दारू विक्रीची माहिती पोलिसांना देऊन दारू पकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांनी सहकार्य केले नाही तर स्वत; दारू पकडून विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
220921\180-img-20210922-wa0029.jpg
दारुबंदीकरीता सरसावलेल्या मोहरणा येथील महिला