सासरा : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विठ्ठल व शौर्य ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन तथा बालिका दिन तथा स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद भंडारा येथील समाजकल्याण सभापती रेखा वासनिक यांच्या हस्ते व सरपंच शालीकराम खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चुन्नीलाल वासनिक, तालुका अभियान व्यवस्थापक कमलेश फरकुंडे, मुख्याध्यापक अंबादे, प्रा. नाजुकराम बनकर, माणिकराव खर्डेकर, गजानन गोटेफोडे, सरपंच रविंद्र खंडाळकर, चामट, प्रभाग समन्वयक अर्चना बडोले, हेमलता लोणारे, श्रीरंग खोब्रागडे, नलिनी बनकर, सहनाज बोरकर, अनुसया वासनिक, अवंती वासनिक, गोपाल मेश्राम, भोवते, पवनकर, वामन वासनिक उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठाच्या अग्रस्थानी असलेल्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गावातीलच युवा कलाकार गणेश खडके यांनी रांगोळीतून साकारलेली सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आकर्षणाचा विषय बनली होती. प्रस्तुत कार्यक्रम येथील ग्रामपंचायतीच्या आवारात घेण्यात आला. संचालन वर्धिनी मंगला गोटेफोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सीआरपी विशाखा मेश्राम यांनी पार पाडले. यशस्वीतेसाठी गावातील सर्वच बचतगटातील सखींनी सहकार्य केले