एकजुटीने लढण्याचा निर्धार : पालोरा येथील मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थितीकरडी (पालोरा) : मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्ज पूरवठा केल्यानंतर आता त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे अनेक महिलांनासमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे. या विरोधात रणसिंग फुंकण्यासाठी महिला मेळावा घेण्यात आला. माजी जि. प. सदस्य के. बी. चौरागडे यांच्या नेतृत्वात पालोरा येथे हा मेळावा घेण्यात आला.मेळाव्याला तुमसर, भंडारा, साकोली व मोहाडी तालुक्यातील हजारो महिलांची उपस्थिती होती. महिलांनी कंपन्यांच्या लुबाडणुकीच्या धोरणाविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शासनाने कर्ज माफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा ठराव मंजुर करण्यात आला. मेळाव्यासाठी महिला स्व:खर्र्चाने पोलारा येथे आल्या. यामध्ये महिला व पुरुषांचा समावेश होता. यावेळी चौरागडे यांनी, देशात फक्त दोन मायक्रोफायनांस कंपन्यांची नोंदणी असून उर्वरित ३५ व ३६ कंपन्या महिलांना कर्जाचे वितरण करतात. एकाच महिलांना ३५ कंपन्याकडून कर्ज दिला असल्याचे दाखविले जाते. जेव्हा की वस्तुस्थिती वेगळीच आहे. एकाच आधारकार्डवर म्हणजे एकाच नंबरवर अनेक कपंन्या फायनान्स करीत असून महिलांची दिशाभूल व लुबाडणूक केली जात आहे. मोठ्या प्रमाणात व्याजाची आकारणी करीत आहेत. दबाव टाकुन जबरीने मिळेल त्या साहित्यांना जप्त करण्याचे, धाक व दडपशाहीचे धोरण कंपन्याकडून केले जाते. असा आरोप करण्यात आला आहे. जोपर्यंत कर्ज माफ केले जात नाही, तोपर्यंत कंपन्यांना पैसे परत न करण्याचा मनोदय महिलांनी व्यक्त केला. कंपन्याच्या धोरणाविरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त होत असून त्या आक्रोशाला संगटित दिशा देण्यासाठी पालोरा येथे महिलांचा जनजगृती मेळावा आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्याला भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील महिलांनी उपस्थिती दर्शविली. उपस्थित हजारो महिलानी कपंन्यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्याचा व कर्ज शासनाने माफ करण्याचा ठराव एकमुखाने मेळाव्यात पारित केला. खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात मायक्रोफायनांस कंपन्यांच्या अधिकाऱ्याला भेटून कर्ज माफ करण्यासंबंधी चर्चा केली जाणार आहे. असे के .बी. चौरागडे यांनी यावेळी सांगितले. मेळाव्याला जांभोराचे सरपंच भुपेंद्र पवनकर, सामाजिक कार्यकर्ता हितेश बुरडे, मुंढरी बुजचे सरपंच माधुरी उके यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी करडी, पालोरा, जांभोरा व परिसरातील महिलांनी सहकार्य करून तो यशस्वी केला. (वार्ताहर)
मायक्रोफायनान्स विरोधात महिलांचा एल्गार
By admin | Published: January 16, 2017 12:29 AM