आॅनलाईन लोकमतसाकोली : महिला वनमजुरांना नेहमी काम देण्यात यावे. तसेच सहायक वनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या साकोली, लाखनी व लांखादूर अंतर्गत करण्यात आलेल्या रोपवाटीका कामात व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीला घेवून महिला वनकामगारांनी उपोषणाला प्रारंभ केलेला आहे.साकोली येथील वन कार्यालयासमोर सदर उपोषण सुरु आहे. निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांमध्ये, वनपरिक्षेत्र अधिकारी साकोली, लाखनी व लाखांदूर यांनी रोप वाटीका कामात, एमआरईजीएस व इतर कामात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, २४० दिवसांच्या वर एका वर्षात झालेल्या व नियमित कामावर असलेल्या महिला कामगारांना काम देण्यात यावे, विर्शी रोपवाटीकेतील जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत नियमित काम केलेल्या महिला मजुरांचे अर्धवट काढण्यात आलेले वेतन पुर्ण देण्यात यावे, विर्शी रोपवाटीकेतील मस्टरची चौकशी करण्यात यावी, एप्रिल २०१७ पासून सुरु असलेल्या महाराष्टÑ राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची माहिती देण्यात यावी, तत्कालीन दोषी अधिकारी व कर्मचारी यांची पेन्शन थांबविण्यात यावी, सध्या कार्यरत असलेल्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावी, अशी मागणी महिला वन कामगारांनी निवेदनातून केली आहे.उपोषण मंडपात सुनंदा मांढरे, सुमन बन्सोड, मालता नागोसे, कांचन कांबळे, दुर्गा उके, पुष्पकला रामटेके यांचा समावेश आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी कैलास गेडाम, इस्पन शिवणकर, हरिभाऊ खोटेले, पुरुषोत्तम भुरे, मोहन फुंडे यांनी केली आहे.
महिला वनकामगारांचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:40 PM
महिला वनमजुरांना नेहमी काम देण्यात यावे. तसेच सहायक वनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या साकोली, लाखनी व लांखादूर अंतर्गत करण्यात आलेल्या ....
ठळक मुद्देअधिकाऱ्यांची उदासिनता : प्रकरण रोपवाटीकेतील भ्रष्टाचाराचे