शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दारुबंदीसाठी महिलांचा मोर्चा

By admin | Published: September 16, 2015 1:22 AM

लाखनी तालुक्यातील सालेभाटा या छोट्याशा गावात महिनाभरापासून दारुबंदीचे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

सालेभाटा येथे महिला सरसावल्या : महिलांची उपस्थिती लक्षणीयसालेभाटा : लाखनी तालुक्यातील सालेभाटा या छोट्याशा गावात महिनाभरापासून दारुबंदीचे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आज मंगळवारला गावातून शेकडो महिलांनी मोर्चाद्वारे दारुबंदीची मागणी केली.सामाजिक कार्यकर्ते नरेश बोपचे व ग्रामपंचायत सदस्य कैलाश भगत, ओमप्रकाश पटले यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता गावातील प्रमुख मार्गांनी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. ज्ञानेश्वर नगरमधून निघालेल्या मोर्चाची सांगता बसस्थानक चौकात करण्यात आली. मुलाबाळांचे भवितव्य, महिलांचे सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य, तंटामुक्ती एकूणच सर्वांगीण ग्रामविकासाच्या हेतूने हे आंदोलन २० आॅगस्टपासून सुरु करण्यात आले आहे. ग्रामसभेत घेतलेला ठराव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागांना देण्यात आला आहे. दारुबंदीच्या जनजागृतीसाठी ३० सप्टेंबरला जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी जि.प. सदस्य मोरेश्वरी पटले, आंदोलन समितीचे अध्यक्ष जयश्री कोहळे, सचिव ओमेश्वरी पटले, उपाध्यक्ष अस्मिता बोपचे, शालू वाघमारे, नाशिका भगत, नोशन बोपचे, सुनिता राहांगडाले आदींची भाषणे झाली. या मोर्चात ग्रामपंचायत, महिला बचत गट व महिलाशक्ती दारुबंदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)