अनलॉक झाल्यानंतर पुलाचे बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले; परंतु पुलाच्या बांधकामाची गती अतिशय संथ आहे. त्यामुळे सदर पूल पूर्ण होण्याकरिता बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून नदीपात्रात पाण्याची वाढ होत आहे. त्यामुळे कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
सध्या जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. या पुलाचे आयुष्य सुमारे ४५ वर्षे झाले आहे. या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असून नवीन पुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण होण्याची गरज आहे. येथील जुन्या पुलाला हादरे बसतात. पुलाच्या पिलरमध्ये मोठे बेअरिंग आहेत. त्यांची दुरुस्ती व सर्व्हिसिंग करण्याची गरज आहे. पुलावर खड्डे पडले असून पावसाळ्यात पुलावर पाणी साचते. खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी वाहने या खड्ड्यांतून उसळी मारतात. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांचा येथे अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाने पुलाचे बांधकाम करण्याकरिता दखल घेण्याची गरज आहे.