लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यात सुरु असलेल्या रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून वरिष्ठांचे याकडे कोणतेही लक्ष नाही. धाबेटेकडी ते पिंपळगाव सडक या मार्गावर अतिशय निकृष्ट काम सुरु असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्यांनी केला आहे.लाखनी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम करताना डांबराचा वापर योग्य प्रमाणात करण्याचे निर्देश आहे. परंतु डांबर कमी वापरून जुने आॅईल वापरले जात आाहे. तसेच इतर साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे. रोलरद्वारे दबाई कमी होत असल्याने आताच हा रस्ता ठिकठिकाणी फुटला आहे. उन्हाळ्यात पहिल्या कोटचे बांधकाम झाल्यानंतर पावसाळ्यात चार महिने काम बंद होते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. संबंधित कामावर कनिष्ट अभियंता दुर्लक्ष करीत असून कंत्राटदार व शासकीय कंत्राटदाराचा संबंध असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, पंकज शामकुवर यांनी केला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पिंपळगाव सडक ते रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी, मुरमाडी तुपकर, झरपड, कोलारी, खुनारी, खुर्शी रस्ता ४.५ किमी, डांबरी रस्ता ४.१ किमी काँक्रीट रस्ता ४०० मोऱ्या अशा बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. बरेसचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सदर कामाची अंदाजे किंमत २१६ लाख आहे. या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.मुख्यमंत्री ग्रामसडकचे कनिष्ठ अभियंता शैलेश हरकंडे म्हणाले, शासकीय नियमानुसार रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. कामाच्या ठिकाणी सर्व मटेरियलची तांत्रिक तपासणी करण्यात येते. काम सुरु असून रहदारी सुद्धा सुरु आहे. ताज्या कामावर वाहतूक झाल्याने काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते दुरुस्त करण्यात येत आहेत.चौकशीची मागणीलाखनी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या सर्वच कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. मात्र याकडे प्रशासन जाणीवपुर्वीक दूर्लक्ष करीत आहे. लाखनी तालुक्यात अनेक रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. परंतु पावसाळ्यानंतर या सर्व कामांचे पितळ उघडे पडले आहे. निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरल्याचा हा परिणाम आहे. रस्त्याची दुरावस्था अवघ्या सहा महिन्यात झाल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. परंतु कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून कारवाई केली जात नाही. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वाहनांचे अपघात होवून अनेक जण जखमी होतात. संबंधित विभागाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसोबतच तालुक्यात झालेल्या विविध रस्त्यांच्या कामाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:00 AM
लाखनी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम करताना डांबराचा वापर योग्य प्रमाणात करण्याचे निर्देश आहे. परंतु डांबर कमी वापरून जुने आॅईल वापरले जात आाहे. तसेच इतर साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे. रोलरद्वारे दबाई कमी होत असल्याने आताच हा रस्ता ठिकठिकाणी फुटला आहे. उन्हाळ्यात पहिल्या कोटचे बांधकाम झाल्यानंतर पावसाळ्यात चार महिने काम बंद होते.
ठळक मुद्देसंडे अँकर । नागरिकांची तक्रार, पिंपळगाव ते मुरमाडी मार्गाचे प्रकरण