मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीने केली. तीच कामे एका वर्षात तर कुठे दीड ते दोन वर्षात लघु पाटबंधारे विभागाने केल्याची धक्कादायक माहिती आहे. जलयुक्त शिवार योजनेत पाणी मुरत आहे. सदर कामांची विभागीय चौकशीचे संकेत मिळाले आहे. तुमसर तालुक्यातील अनेक कामांची चौकशी होणार असल्याचे समजते. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.गावातील मयूर शेतमजूरांना कामे मिळावी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे दरवर्षी करतात. चिखला येथे गट क्रमांक १० मध्ये तलाव असून त्या तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती सुमारे दिड वर्षापुर्वी रोजगार हमी योजनेतून करण्यात आली होती. चिचोली येथे तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती केवळ एक वर्षापुर्वी रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायतीने केली. खंदाड येथील तलावाचे खोलीकरण दीड वर्षापुर्वी करण्यत आले. तीच कामे पुन्हा लघु पाटबंधारे विभागाने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केली आहेत.एकाच तलावाची सारखी कामे दोन शासकीय योजनेतून करता येते काय? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य संगिता सोनवाने यांनी उपस्थित केला आहे.चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत मागील तीन वर्षात तलाव दुरुस्ती व खोलीकरणाची कामे करण्यात आली. यात रोजगार हमी योजनेतूनही कामे झाली व लघु पाटबंधारे विभागाने कामे केली. जिल्हा परिषदेअंतर्गत कामांबाबत सोनवाने यांनी शंका उपस्थित केली. सौदेपूर येथे मामा तलाव दुरुस्ती गट क्रमांक ६, मामा तलाव दुरुस्ती राजापूर गट क्रमांक ५५३, ५८८, मामा तलाव दुरुस्ती धुटेरा २४८, मामा तलाव दुरुस्ती खंदाड, मामा तलाव दुरुस्ती भोंडकी, चिचोली गट क्रमांक ३८७, २७६, मामा तलाव दुरुस्ती गोबरवाही क्रमांक ६, सिमेंट नाला बांधकाम राजापूर गट क्रमांक ५३२, गट क्रमांक ३०२, सिमेंट नाला बांधकाम सौदेपुर, ल.पा. तलाव दुरुस्ती चिखला, सीतासावंगी, साठवण बंधारा दुरुस्ती सितासावंगी, साठवण बंधारा दुरुस्ती गोबरवाही क्रमांक १, २, सिमेंट प्लग बंधारा दुरुस्ती भोंडकी क्रमांक १, क्रमांक २ व क्रमांक ३ चा समावेश आहे.यापैकी मामा तलाव दुरुस्ती भोंडकी गट क्रमांक १३, क्रमांक २३३, चिचोली क्रमांक २७६, गोबरवाही गटक्रमांक ६ ची कामे अपूर्ण आहेत. कामांची विभागीय चौकशीची मागणी जि. प. सदस्य संगिता सोनवाने यांनी केली आहे.एक ते दीड व दोन वर्षात विविध तलाव प्लग बंधारे इत्यादींची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आली. तीच कामे लघु पाटबंधारे विभागाने जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली. या सर्व प्रकरणांची विभागीय चौकशीची मागणी केली आहे.- संगीता सोनवाने, जिल्हा परिषद सदस्य चिखला (तुमसर)ग्रामपंचायतीने काम केल्यावर नियमाप्रमाणे तलाव खोलीकरण व दुरुस्तीची कामे केली जातात. त्या अनुषंगाने कामे कुठे केली असतील. कोणतीही कामे नियमानुसारच केली जातात.- चंदन बटवे, कनिष्ठ अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जि.प. भंडारा
जलयुक्त शिवार योजनेत दुसऱ्यांदा कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 9:55 PM
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीने केली. तीच कामे एका वर्षात तर कुठे दीड ते दोन वर्षात लघु पाटबंधारे विभागाने केल्याची धक्कादायक माहिती आहे. जलयुक्त शिवार योजनेत पाणी मुरत आहे. सदर कामांची विभागीय चौकशीचे संकेत मिळाले आहे. तुमसर तालुक्यातील अनेक कामांची चौकशी होणार असल्याचे समजते. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील प्रकार : विभागीय चौकशीकरिता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार