देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात रब्बी हंगामानंतर मजुरांना कामे मिळणे कठीण झाले असताना रोहयोची कामे वाढविणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे केली जात असून, या कामांवर सात हजार १७६ मजूर कार्यरत आहेत. तसेच सध्या जिल्ह्यातील जॉबकार्डधारकांची संख्या वाढली आहे.हाताला काम नसेल तर शंभर दिवसाचा रोजगार पक्का म्हणून हमखास रोजगाराची गॅरंटी देण्यासाठी रोजगार हमी योजना पुढे आली. काम नसेल तर बेरोजगार भत्ता असे घोषवाक्य या योजनेत जोडण्यात आले. यामुळे लाखो नागरिकांनी आपली रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात नोंद केली. ही नोंद आता दोन लाख ३५ हजारांवर पोहोचली आहे. काम करणाऱ्या मजुरांचा हा आकडा अडीच लाखांचा असला तरी प्रत्यक्ष काम करणारे खरे कामगार मोजकेच आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना त्या ठिकाणी पैसे तत्काळ मिळत नाही. या ठिकाणची कामे अनेकांना हार्ड वाटतात. याशिवाय रोजमजुरीवर काम करण्यासाठी अनेकांची मानसिकता राहिलेली नाही. यामुळे या योजनेत काही तर लाभ मिळेल, म्हणून मोठ्या येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच प्रमाणात नाव नोंदणी झाली. प्रत्यक्षात कामावर गेल्याशिवाय मजुरी मिळणार नाही हे कळाल्यानंतर या कामावर कामावर येणाऱ्या मजुरांची संख्या आपसुकच कमी झाली आहे. मजुरांना इतर ठिकाणी कामाच्या शोधात जायचे काम पडू नये, गावात किंवा परिसरातच त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे दिला जातात. जिल्ह्यात रबी हंगामाती कामे संपली असताना रोजगाराची समस्या गंभीर बनत आहे. दरदिवशी विविध ठिकाणावरून शेकडो मजूर नागपूर, पुणे, मुंबई आदी महानगरांसह परराज्यात रोजगारासाठी स्थलंतर करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यात सध्या स्थितीत वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षा घेता जिल्हा प्रशासनाने मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयोची कामे वाढवितानाच त्यांना या कामाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसह यंत्रणेंकडून रोहयोची कामे सुरू आहे. यात ८८ कामे यंत्रणांची आहे.
पवनी तालुक्यात सर्वात कमी कामगार पवनी तालुक्यात सर्वात कमी मजूर कामावर आहे. सन २०२०-२१ ची आकडेवारी लक्षात घेतल्यानंतर पवनी तालुका मजुरांमध्ये माघारलेला दिसतो. तालुकानिहाय आकडवारीनुसार भंडारा २६२४७, लाखांदूर ३४७८७, लाखनी ३५४२६, मोहाडी ४७५९, पवनी २९४११, साकोली ३६७८९, तुमसर ३४३११ मजुरांसाठी कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मात्र ज्या प्रमाणात नोंदणी झाली. त्या प्रमाणात आजपर्यंत कधीच मजूर उपलब्ध झाले नाही. १४०९ ग्रामपंचायतंर्गत कामे सुरूआहे.
रोजगार हमी योजनेत प्रत्येकांच्या हाताला काम मिळत असले तरी रोजगार हमी योजनेतील कामे अतिशय कठीण असतात. त्याऐवजी शेतशिवारात राबणाऱ्या मजुरांना रोजगार हमी योजनेतून मजुरी मिळाली तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि मजुरांनाही त्याचा फायदा मिळेल. मात्र तसे होत नाही. राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे - शरद भूते, शेतकरी.
शेतीची कामे संपल्यानंतर आता रोजगाराची स्थिती गंभीर आहे. त्यात परिसरात रोहयोच्या कामांबाबत काही हालचाली दिसत नसल्याने मागणी करून फायदा होणार काय, असा विचार येतो. परिसरात रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे. अनेकदा भर उन्हात रोहयोची कामे केली जातात. परिणामी मजुरांना त्रास होतो.- राजू सार्वे, बेरोजगार