लाखनी तालुक्यातील सेलोटी येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत महिला शेतकरी यांना शेतीशाळेतून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी उपसंचालक अरुण बलसाने, लाखणीचे तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, कृषी पर्यवेक्षक गणेश शेंडे, कृषी सहायक अजय खंडाईत यांच्यासह महिला शेतकरी व बचत गटाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण यांनी महिला शेतकऱ्यांना भात पिकामध्ये गादीवाफा नर्सरी तयार करण्यासंदर्भात तसेच निंबोळी अर्क गोळा करून युरिया ब्रिकेटचा वापर, अझोला निर्मितीचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी उपसंचालक अरुण बलसाने यांनी महिलांना पारंपरिक पिके घेण्याऐवजी भाजीपाला पिकांचा कडधान्य पिकाचे उत्पादन घेत गृहोद्योगातून आर्थिक सक्षम होण्याचे आवाहन केले. लाखणीचे तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी महिला बचत गटांचे काम व शेती व्यवसायामध्ये महिलांचा वाढत असलेला सहभाग, सेंद्रिय शेतीसह युरिया ब्रिकेटचा वापर, निंबोळी अर्क तयार करणे या प्रात्यक्षिकांमध्ये महिलांचा सहभाग वाढला असल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दि. २१ जून रोजी रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान (बीबीएफ लागवड पद्धत), तर २२ जून रोजी बीज प्रक्रिया, २३ जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर कसा करावा, २४ जून रोजी कापूस व एक गाव एक वाण सुधारित भातलागवड तंत्रज्ञान पद्धती, २५ जून रोजी विकेल ते पिकेल अभियानाबद्दल मार्गदर्शन, २८ जून रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ जून रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रमुख पिकाची उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० जून रोजी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोगनियंत्रणाच्या उपाययोजनांचे मार्गदर्शन, तर १ जुलै रोजी कृषिदिन आणि मोहिमेचा समारोप साजरा करण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान अवगत करा
महिला शेतकऱ्यांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत शेतीला पूरक अशा उद्योगांची उभारणी करावी. यासाठी कृषी विभागाचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल तसेच महिलांनी शेती व्यवसायातून इतर महिलांना गावातच रोजगाराची संधी द्यावी, असे आवाहन यावेळी तालुका कृषी अधीक्षक विभागातर्फे करण्यात आले.