लाखनी तालुक्यातील सेलोटी येथे कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत महिला शेतकऱ्यांना शेती शाळेतून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कृषी उपसंचालक अरुण बलसाने, लाखणीचे तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, कृषी पर्यवेक्षक गणेश शेंडे, कृषी सहायक अजय खंडाईत यांच्यासह महिला शेतकरी व बचत गटाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण यांनी महिला शेतकऱ्यांना भात पिकामध्ये गादीवाफा नर्सरी तयार करण्यासंदर्भात, तसेच निंबोळी अर्क गोळा करून युरिया ब्रिकेटचा वापर, अझोला निर्मितीचे सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी उपसंचालक अरुण बलसाने यांनी महिलांना पारंपरिक पिके घेण्याऐवजी भाजीपाला पिकांचा कडधान्य पिकाचे उत्पादन घेत गृहउद्योगातून आर्थिक सक्षम होण्याचे आवाहन केले. लाखणीचे तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी महिला बचत गटांचे काम व शेती व्यवसायामध्ये महिलांचा वाढत असलेला सहभाग, सेंद्रिय शेतीसह युरिया ब्रिकेटचा वापर, निंबोळी अर्क तयार करणे या प्रात्यक्षिकांमध्ये महिलांचा सहभाग वाढला असल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील शेतकरी, तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
आधुनिक तंत्रज्ञान अवगत करा
महिला शेतकऱ्यांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत शेतीला पूरक अशा उद्योगांची उभारणी करावी. यासाठी कृषी विभागाचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल, तसेच महिलांनी शेती व्यवसायातून इतर महिलांना गावातच रोजगाराची संधी द्यावी, असे आवाहन यावेळी तालुका कृषी अधीक्षक विभागातर्फे करण्यात आले.