काव्यप्रेमी शिक्षक मंच भंडारा, आम्ही लेखिका सखी साहित्य संघटन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांच्या काव्यसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वसुधा आठवले होत्या. उद्घाटक म्हणून वाचनालयाचे सचिव डॉ. जयंत आठवले, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रेमराज मोहकर, काव्यप्रेमी शिक्षण मंचच्या नागपूर विभागीय अध्यक्ष कविता कठाणे, जिल्हाध्यक्षा स्वाती रुद्र, उपाध्यक्षा डॉ. अस्मिता नानोटी, सचिव डॉ. जयश्री सातोकर, सहसचिव मंगला डहाके, कार्याध्यक्ष छाया कावळे, उपाध्यक्ष वैशाली काळे, कार्याध्यक्षा मधुरा कर्वे, कोषाध्यक्ष मेघा भांडारकर, निमंत्रक डॉ. अनिता जयस्वाल, डॉ. विशाखा गुप्ते उपस्थित होत्या.
काव्यसंमेलनात एकूण बावीस कवयित्रींनी काव्य सादर केले. पाहुण्यांचा परिचय मधुरा कर्वे, अर्चना गुर्वे यांनी करून दिला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष स्वाती रुद्र यांनी केले. मार्गदर्शन करताना कवयित्री कविता कठाणे यांनी, मोहन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आम्ही लेखिका साहित्य संघटन साकार झाले असून, कुलकर्णीं सरांचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करुया, असे सांगितले.
यावेळी विभागीय अध्यक्ष कविता कठाणे, जिल्हाध्यक्ष स्वाती रुद्र, उपाध्यक्ष डॉ. अस्मिता नानोटी, सचिव डॉ.जयश्री सातोकर,सहसचिव मंगला डहाके, कार्याध्यक्ष छाया कावळे, उपाध्यक्ष वैशाली काळे, अध्यक्षा मधुरा कर्वे, कोषाध्यक्ष मेघा भांडारकर, डॉ.अनिता जयस्वाल, डॉ. वसुधा आठवले, डॉ. विशाखा गुप्ते, मंगला डहाके यांचा सन्मान चिन्ह व मेडल देऊन गौरव करण्यात आले.
याप्रसंगी सुषमा पडोळे, स्वाती सेलोकर, नूतन मोघे, उषा घोडेस्वार, मेघा भांडारकर, मुक्ता आगाशे, यशोदा येळणे, सुषमा घुबडे, श्रुती बावनकर, मंजूषा साठे आदींनी काव्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. वसुधा आठवले यांनी 'आता छेड काढणार,याची धडगत नाही' अशा आशयाचे काव्य सादर केले. सूत्रसंचालन डॉ. जयश्री सातोकर, छाया कावळे यांनी केले. आभार कविता कठाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी वाचनालयाचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी वृंद, महिला यांचे सहकार्य लाभले.