लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर स्थानिक उद्योगात स्थानिक बेरोजगारांना काम उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. परंतु चिखला मॉईल प्रशासनाकडून नजीच्या सीतासावंगी गावात कर्मचाऱ्यांकरिता सुमारे १०० सदनिकेचे बांधकाम १४ ते १५ कोटी किंमतीची सुरु आहेत. सदर बांधकामावर परप्रांतीय मजूर, कामार कुशल व अकुशल कामे करीत आहेत. स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.चिखला येथे भूमीगत मॅग्नीज खाण असून खाणीचे विस्तार वाढल्याने कर्मचाºयांकरिता सदनिका बांधकाम करण्याचा निर्णय मॉईल प्रशासनाने घेतला आहे. सीतासावंगी येथे सुमारे १०० सदनिकांचे बांधकाम सध्या सुरु आहे. सुमारे १४ ते १५ कोटींचे बांधकाम आहे. बांधकामावर कुशल व अकुशल मजूर, कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कुशल व अकुशल कामगार परप्रांतीय आहेत. स्थानिक बेरोजगारांना येथे डावलण्यात आले आहे. येथे स्थानिक बेरोजगार युवकांत प्रचंड असंतोष व्याप्त आहे. मॉईलमध्येही स्थानिकांना डावलण्यात आले आहे. भरती प्रक्रिया शासनाकडून होते म्हणून स्थानिक बेरोजगार युवक गप्प झाले, पंरतु बांधकामाच्या कामावरही परप्रांतीय मजूरांना घेतल्याने येथे उद्रेक होण्याची शक्यता आहे. स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम न देता परप्रांतीयांना काम दिल्याने शिवसेना येथे आंदोलन करणार असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी प्रशासनाला कळविले आहे. स्थानिकांना प्रथम प्राधान्य या नियमाला तिलांजली दिली तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी दिला आहे.
स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:46 PM
स्थानिक उद्योगात स्थानिक बेरोजगारांना काम उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. परंतु चिखला मॉईल प्रशासनाकडून नजीच्या सीतासावंगी गावात कर्मचाऱ्यांकरिता सुमारे १०० सदनिकेचे बांधकाम १४ ते १५ कोटी किंमतीची सुरु आहेत.
ठळक मुद्देशिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा : १५ कोटींच्या सदनिका बांधकाम