आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्यात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे.त्याच्या निषेधार्थ वस्तू व सेवाकर खात्यातील अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना व गट ड कर्मचारी संघटनाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वदूर महाराष्ट्रातील ४ ते ८ डिसेंबर असे पाच दिवस काळ्या फिती लावून काम करण्याचे ठरविले आहे, असे अधिकारी संघटनेच्या सहायक राज्यकर आयुक्त अश्विनी बिजवे व महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटना मुंबई नागपूर विभागाचे सदस्य राजेश राऊत यांनी माहिती दिली.वस्तु व सेवा कर विभागाच्या प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासनाच्या निर्देशानुसार योग्यरितीने कामेसुद्धा पुर्ण केली. परंतु या सर्व कार्यवाहीमध्ये गट ड कर्मचाºयांपासून ते वरिष्ठ अधिकारी पदापर्यंतच्या सर्वांना सेवाशर्ती आणि प्रश्नांकडे शासन प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शासन उद्दीष्टपुर्ती करण्याकरिता आवश्यक गट ड संवर्गासह सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा, राज्यकर विभागातील खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करावे, वस्तू व सेवा कर विभागात केंद्राच्या धरतीवर समान काम, समान पद व समान वेतन ही त्रिसुत्री लागू करा, विभागातील वेतनत्रुटीचे प्रश्न सत्वर मार्गी लावा. राज्यकर सहआयुक्त व राज्यकर उपआयुक्त वर्गातील कुंठीतता दूर करा, अधिकाऱ्यांच्या कामाचे वाटप समान व योग्य प्रमाणात करण्यात यावे, विभागाच्या पुर्नरचनेत व सेवा नियमातील बदलात संघटनांना विश्वासात घेणे, अधिकारी कर्मचारी सेवाशर्ती टिकविण्याकरिता योग्य धोरणांचा अवलंब करा, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तू व सेवाकर भवन उभारून भवनामध्ये अद्यावत आसन व्यवस्थेसह, संगणकासह सर्व साधन सामुग्री पुरवावी, विभागीय संवर्ग वाटप अधिनियमामधून राज्यकर विभागास कायमस्वरूपी सूट द्यावी, अधिकारी व कर्मचाºयांवरील ताणतणाव कमी करावा व सन्मानजनक वागणूक मिळावी आदी या विषयक सर्वच बाबींवर शासन प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे, अशी माहिती अधिकारी संघटनेच्या सहायक राज्यकर आयुक्त अश्विनी बिजवे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:59 PM
राज्यात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागत आहे.
ठळक मुद्देसन्मानजनक वागणुकीची मागणी : शासनाच्या निषेधार्थ घेतला पुढाकार, प्रशासनाला निवेदन