भंडारा : सिरसी ग्रामपंचायत येथे विदर्भ कोकण ग्रामीण बॅक शाखा भंडारा व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नाबार्ड स्थापना दिवस निमित्ताने कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमात महिलांच्या व पुरुषांच्या उपस्थित विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक व नाबार्ड यांच्यामार्फत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून द्वीप प्रज्वलित करण्यात आले. महिलांना व पुरुषांना स्वत: आर्थिकरित्या कशा सक्षम करू शकतात, एटीएम वापरताना, व्यवहार करताना पैसे कसे सुरक्षित ठेवावे, जागरूकता पसरविणे उद्देश आहे, बॅंकेचे ॲप वापरत असताना जपूनच वापरावे, असे संदीप देवगीकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये ४० महिला व पुरुषांनी डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला. डोळे तपासून औषध वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक संदीप देवगिरकर, जिल्हा व्यवस्थापाक विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक चिंधालोरे, नेत्र तज्ज्ञ डॉ, रोकडे, शाखा प्रबंधक मावळनकर, शुभांगी मोटघरे, नीलिमा भुरे या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सिरसी येथे कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:24 AM