उपक्रम : ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात मार्गदर्शनभंडारा : सेवानिवृत्त शिक्षक मित्रमंडळ, जिल्हा भंडाराद्वारा सकारात्मक विचार द्वारा तणावमुक्त जीवन या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी ई्श्वरीय विश्वविद्यालय केंद्र येथे पार पडला.याप्रसंगी अतिथी म्हणून ब्रह्मकुमार पुरूषोत्तम जवाहरनगर यांनी तणावमुक्त विधी आपल्या जीवनासहजरित्या साध्या सोप्या पद्धतीने अंगीकारता येते. हे प्रात्यक्षिका द्वारे समजावून सांगितले. अतिथी नीळकंठराव रणदिवे यांनी अध्यात्मीक केंद्रांशी वैचारिक संबंध असल्याचे आणि अध्यात्मिक अनुभव असल्याचे कवितेतून समजावून सांगितले.वर्तमान काळात जीवन जगताना व्यक्ती खुप प्रगतिशील दिसत असला तरी अंतरंगातून खुप दु:खी, कष्टी आणि तणावयुक्त जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे. आतंकवाद, नक्षलवाद, राजकारण, समाजकारण आणि नैसर्गिक असमानता यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम बहोत असल्याचे जाणवत आहे. ही बाब लक्षात घेता मानवी जीवन सुखमय, आनंदी, प्रेमयुक्त, तनावमुक्त कसे होऊ शकते यावर मेडिटेशन हा हमखास उपाय असल्याचे भंडारा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी शोभा दीदी यांनी सांगितले.या कार्यक्रमाला प्रा. वामन तुरीले, हरिकृष्ण घाटबांधे, रामदास शहारे, ब्रम्हकुमारभाई, ब्रह्मकुमारी भगिणी उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक लक्ष्मणराव चापले मंडळाचे कोषाध्यक्ष यांनी आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष शरद नखाते यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
तणावमुक्त जीवनावर कार्यशाळा
By admin | Published: June 21, 2016 12:28 AM