लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यामधील चुकीच्या पद्धतीचे विस्थापित शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छापुरे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्यांची पुर्तता १५ दिवसात न झाल्यास संघटनेद्वारे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.आॅनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक व संवर्ग दोनमधील शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे व चुकीचे अंतराचा पुरावा देऊन बदली पोर्टलवर माहिती भरली. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले. चुकीची माहिती भरणाºयांची सक्षम संघटनेद्वारे चौकशी करून त्यांच्याविरूद्ध जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. अन्यायकारक पद्धतीने विस्थापित झालेल्या शिक्षकांना न्याय मिळविण्यासाठी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षकांचे निश्चित करून रिक्त जागा त्वरीत भरणे, ११७ आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या २०१६ मधील माहे मे २०१६ व जून २०१६ या दोन महिन्याचे थकित वेतन त्वरीत अदा करणे, वर्ग ६ ते ८ ला शिकविणाऱ्या विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लावणे, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रकरणास मुल्यमापन समितीद्वारा मंजुरी देणे, मोहाडी पंचायत समितीमधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे जीपीएफ पावत्या उपलब्ध करून देणे, शालेय पोषण आहाराचे थकित अनुदान अविलंब मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा करणे, मंजूर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढण्यासाठी तालुका स्तरावरून माहिती मागवून आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करून प्रकाशित करणे, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासाठी १५ दिवसाचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर जिल्हा संघटना निर्णय घेण्यासाठी मोकळी राहील, असे सांगण्यात आले.यावेळी संजीव बावनकर, रमेश काटेखाये, शंकर नखाते, राधेश्याम आमकर, दिलीप बावनकर, विकास गायधने, बाबुराव गिऱ्हेपूंजे, उमेश गायधने, विवेक हजारे, नरेंद्र कोहाड, सुभाष खंडाईत, वनवास धनिस्कर, योगेश कुटे, चेतन बोरकर, राजकुमार चांदेवार, सुधीर वाघमारे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचे शिक्षकांचे विस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 10:24 PM
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यामधील चुकीच्या पद्धतीचे विस्थापित शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छापुरे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आंदोलनाच्या पवित्र्यात