विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पंतप्रधानांच्या साकोली दौºयाच्यावेळी अड्याळ ग्रामीण रुग्णालयातून नेलेली एक्स-रे मशीन दोन महिने झाले तरी परत आली नाही. त्यामुळे अड्याळ ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांना एकतर घर वापसी नाहीतर भंडारा येथे जावे लागते. रुग्ण कल्याण समितीनेही याबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याने रुग्णांत संताप व्यक्त होत आहे.पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ग्रामीण रुग्णालय आहे. अती तातडीच्या वैद्यकिय सेवेसाठी येथे मोबाईल एक्स-रे मशीन पुरविण्यात आली होती. ग्रामीण भागातील रुग्णांचे एक्स-रे काढून त्यांच्यावर उपचार केले जात होते. परंतु विधानसभा निवडणूक काळात साकोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होती. या सभेच्या तयारीत आरोग्य विभागाने अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन तात्पूरत्या स्वरुपात साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थानांतरित केली. सभेनंतर दोन-चार दिवसात ही मशीन येईल असे वाटत होते. परंतु आता निवडणूक होऊन दोन महिने झाले तरी अद्यापही एक्स-रे मशीन परत आली नाही. वैद्यकिय अधीक्षकांनी एक्स-रे मशीनसाठी वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु साकोली उपजिल्हा रुग्णालयात ही एक्स-रे मशीन अड्याळला परत पाठविली नाही. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे. रुग्णकल्याण समितीही यावर एकशब्द बोलायला तयार नाही. आता ही मशीन परत कधी येणार याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.अड्याळ ग्रामीण रुग्णालयातंर्गत जवळपास ८० गावातील रुग्णांना आरोग्य सुविधा दिली जाते. अड्याळ येथे पोलीस ठाणे असून तेथील कर्मचारी एमएलसी करीता जखमींना ग्रामीण रुग्णालयात घेवून येतात. परंतु रुग्णालयात एक्स-रे मशीन नसल्याने त्यांना परत जावे लागते. तसेच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांनाही एक्स-रे साठी मोठी अडचण होत आहे. एक्स-रे काढावयाचा असल्यास भंडारा येथे जाण्याशिवाय परिसरातील रुग्णांना पर्याय नाही.
पंतप्रधान दौऱ्यासाठी नेलेली एक्स-रे मशीन परत आलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 6:00 AM
पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ग्रामीण रुग्णालय आहे. अती तातडीच्या वैद्यकिय सेवेसाठी येथे मोबाईल एक्स-रे मशीन पुरविण्यात आली होती. ग्रामीण भागातील रुग्णांचे एक्स-रे काढून त्यांच्यावर उपचार केले जात होते. परंतु विधानसभा निवडणूक काळात साकोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होती.
ठळक मुद्देअड्याळ ग्रामीण रुग्णालय। दोन महिन्यांपासून ग्रामीण रुग्णांची परवड