चेंडू नगर पालिकेच्या कोर्टात : प्रकरण जिल्हा महिला रूग्णालयाचे, आश्वासन हवेत विरले काय?इंद्रपाल कटकवार भंडाराजिल्हा पातळीवरील महत्वपूर्ण विषय असलेल्या महिला रूग्णालयाच्या निर्णयावर अजुनपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी १५ महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. यात १५ आॅगस्ट २०१५ रोजी महिला रूग्णालयाच्या कामाचे भूमिपुजन करू अशी घोषणा केली होती. मात्र वर्ष लोटुनही भुमिपुजन झाले नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महिला रूग्णालयाच्या बाबतीत ३० दिवसांच्या आत कारवाई करावी, असा निर्णयाचा चेंडू भंडारा पालिकेकडे भिरकावण्यात आला आहे.उल्लेखनीय असे की, साडेतीन महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जिल्हा महिला रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न आता निकाली निघाली निघाल्याचे सांगुन जलशुध्दीकरण केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या जागेची पाहणी केली होती. परंतु त्या जागेवर अजुनपर्यंत बांधकामाचा श्रीगणेशा झालेला नाही. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत राज्याचे आरोग्यमंत्रीही आहेत. अशा स्थितीत त्यांनी पालकत्व स्विकारलेल्या भंडारा जिल्ह्यातील महिला रूग्णालयाचा प्रश्न अधांतरी असणे खेदाची बाब आहे. महिला रूग्णालय ज्या जागेत बांधण्यात येणार आहे, त्या जागेच्या संदभार्तील सर्व ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी १ मे २०१६ रोजी दिली होती. लवकरच ही जागा आरोग्य विभागाला हस्तांतरीत करुन महिला रुग्णालयाचे भूमिपजनाची तारीख निश्चित करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र या बाबीला साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटुनही कारवाई अजुनही पूर्ण झालेली नाही. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गाजला मुद्दाकित्येक वर्षांपासून जिल्हा महिला रूग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत पहिल्यांदाच १२ आॅगस्ट २०१६ ला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकित हा मुद्दा चर्चेला आला व चांगला गाजलाही. यात भंडारा शहरात महिला रुग्णालयाकरीता जागा अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही, त्या बाबत नगरपरिषदेने ३० दिवसांच्या आत कार्यवाही करावी, असे पालकमंत्री म्हणाले होते. डीपीसीच्या बैठकीत झालेल्या चर्चेची व निर्णयाची प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशितही केली. जर रूग्णालयासाठी जागा निश्चित असताना बैठकीत असे का सांगण्यात आले, हा प्रश्न सर्वसामाण्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे. यादरम्यान स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमासाठी पालकमंत्री डॉ.सावंत भंडाऱ्यात येणार आहेत. यात त्यांच्या हस्ते सिटी स्कॅन मश्ीनचे उद्घाटन करणार आहेत.
घोषणेला वर्ष लोटले, भुमिपूजन नाही
By admin | Published: August 15, 2016 12:13 AM