राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यांतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी वनविभागात वेगवेगळ्या तीन गावात रस्त्याच्या कडेला पिवळा पळस बहरल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.नाकाडोंगरी वनविभागांतर्गत येत असलेल्या गोबरवाही येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तर दुसरा वृक्ष डोंगरी बुज. येथे आणि तिसरा वृक्ष कवलेवाडाच्या जंगल परिसरात आणि तोही रस्त्याच्या कडेलाच आहे. बहरलेला दुर्मिळ पिवळा पळस पाहण्यासाठी निसर्ग प्रेमींची मोठी गर्दी होत आहे. पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ समजला जात असून त्याल आयुर्वेदात मोठे महत्व आहे. पिवळ्या पळसाचा उपयोग साधारणत: चर्मरोगावर रामबाण इलाजासाठी होतो.पिवळ्या पळसाबद्दल अंधश्रद्धादेखील आहे. गुप्तधन शोधण्यासाठीही या फुलांचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले जाते. परिणामी या झाडांची ओढ गुप्तधन शोधणाऱ्यांना अधिक आहे. त्यामुळे ही पिवळ्या पळसाची प्रजाती हळूहळू लोप पावत चालली आहे. मात्र नाकाडोंगरी वनविभागात पळस वृक्षातील दुर्मिळ प्रजाती पिवळा पळस दिसून आल्याने वनविभागातर्फे त्या वृक्षाचे संरक्षण केले जात असून पिवळ्या पळसाच्या आकर्षणाने बघ्यांची गर्दी वाढत चालली आहे.पिवळा पळस हे दुर्मिळ प्रजाती आहे. वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते हे अल्बिनिझमचा प्रकार असून यामध्ये रंगद्रव्यात बदल होतो. हे जरी खरे असले तरी संपूर्ण तालुक्यात केवळ नाकाडोंगरी वनविभागात तीन झाडे बहरल्याने त्यांच्या संगोपनाची आमची जबाबदारी आहे.-निकेश धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाकाडोंगरी.
भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी जंगलात बहरला पिवळा पळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:11 PM
तुमसर तालुक्यांतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी वनविभागात वेगवेगळ्या तीन गावात रस्त्याच्या कडेला पिवळा पळस बहरल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देअल्बिनिझमचा प्रकार निसर्गप्रेमीत आनंद