शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

येरे येरे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 9:59 PM

आकडेमोडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे आकडे बरे आहेत. इतर तालुक्याच्या तुलनेत मोहाडीवर पावसाची अवकृपा आहे. खरीपाच्या भात लावणीचा हंगाम जोरात असताना अनेक शेत कोरडीच दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी ये रे ये रे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा, अशी आर्त साद वरुणराजाला घालत आहेत.

ठळक मुद्देहंगाम खरीपाचा : ८९२ हेक्टर रोवणी, अनेक शेत कोरडेच

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : आकडेमोडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे आकडे बरे आहेत. इतर तालुक्याच्या तुलनेत मोहाडीवर पावसाची अवकृपा आहे. खरीपाच्या भात लावणीचा हंगाम जोरात असताना अनेक शेत कोरडीच दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी ये रे ये रे पावसा, मोहाडीवर रुसलास कसा, अशी आर्त साद वरुणराजाला घालत आहेत.यावर्षी अनुकुल पर्जन्यवृष्टी होईल असा तर्क बांधण्यात आला होता. लगतच्या नागपूर जिल्ह्यात शहरात पूर आला. तसेच भंडारा जिल्ह्यातही सहाही तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. पण मोहाडी तालुक्यात वरुण राजाने बळीराजावर वक्रदृष्टी केली आहे. पावसाअभावी उशिरा भात पिकाचे रोपे घालण्यात आली. रोपांना जीवंत ठेवण्याएवढा पाऊस झाला. रोपे आता रोवणीसाठी यायला लागली. परंतु अनेक शेतकºयांची जमीन कोरडीच दिसून येत आहे. पुनर्वसू पावसाचा नक्षत्र संपायला एक आठवडा शिल्लक आहे. या अगोदर रोहणी, मृग, आद्रा ही पावसाची नक्षत्र निघून गेली आहेत. पर्यन्य योग, उपयुक्त पाऊस पडण्याची एवढी आशा शिल्लक आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकºयांनीच धान पिकाच्या रोवणीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत २८ हजार ८६४ हेक्टर आर भात पिकाच्या क्षेत्रापैकी केवळ ८९८.१२ हेक्टर आर जमिनीत रोवणी झाली आहे. म्हणजे ३.११ टक्केच रोवणी झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात मोहाडी मंडळात ५२.१, आंधळगाव ३२.१, कांद्री २३.८, वरठी १४५, कान्हळगाव १७.२ व करडी मंडळात १२५.८ मि.मी. पाऊस पडला होता. तरयावर्षी मोहाडी १९३.१, आंधळगाव ९२.३, कांद्री १११.७, वरठी १७०.२, कान्हळगाव ६५ व करडी येथे १७७.६ मि.मी. पाऊस पडला. तसेच १ जुलै ते १० जुलै पर्यंत मोहाडी मंडळात यावर्षी ३२२.८ आंधळगाव १०१.७, कांद्री १०५.३, वरठी ३१५.६, कान्हळगाव १८४.६, करडी ३१६.४ मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच तारखेस मोहाडी मंडळात ११५.३, आंधळगाव ५०.९, कांद्री ५१.५, वरठी २६२.२, कान्हळगाव ९३ व करडी येथे ६६.२ मि.मी. असा पाऊस झाला होता. मोहाडी, वरठी, करडी मंडळात बºयापैकी पाऊस झाला. याच भागात मंदगतीने रोवणीला प्रारंभ झाला आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने ६ हजार ५७१ भात पिकाची जमीन पडीत राहिली. मागील वर्षी मोहाडी तालुक्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत भातपिकाची लागवड झाल्यास उत्पादन समाधानकारक येतो पण, पावसा अभावी रोवणी सप्टेंबर गेली तर भात उत्पादनावर फरक पडत असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली. २० जुलै रोजी पुष्य नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्रात पावसाला म्हातारा पाऊस म्हटले जातो. या नक्षत्रात शेतीत जोरदार पाऊस पडावा यासाठी पर्जन्यदेवाकडे शेतकरी मोठी आस घेवून बसला आहे. मृग नक्षत्रात अनेकांनी शेतामध्ये नांगर, ट्रॅक्टर चालविला. चिराटा केला गेला. पाऊस खूप आला तर चिखलणीसाठी जमीन तयार करण्यात आली. आता सारी भिस्त वरुण राजावर आहे. त्यासाठीच येरे येरे पावसा, मोहाडी तालुक्यावर रुसलास कसा अशी आर्त साद वरूणराजाला करीत आहे.