लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या व आरक्षणासाठी होणाऱ्या धडपडीचा फायदा घेऊन दलालामार्फत ग्राहकांना लक्ष्य बनविले जाते. असाच प्रकार गुरूवारी उघडकिला आला. गुप्त माहितीच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौकातील कॉलेज मार्गावर असलेल्या एका दुकानात रेल्वे आरक्षणाच्या अवैध तिकीट अड्डयावर धाड घातली. यात दुकानदार मो. सिराज अहमद शेख अवैध तिकीट बनवत असल्याचे आढळला. दुकानातून रेल्वेचे अवैद्य आरक्षित तिकिट, संगणक यासह एकूण ६४ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैद्य गोरखधंद्यात लिप्त दलालांवर कारवाई करण्याची मोहीम रेल्वे सुरक्षा दलामार्फत सुरु आहे.रेल्वे तिकीट आरक्षणाचा गोरखधंधा जिल्ह्यातील अनेक भागात धडाक्यात सुरु आहे. प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी अनेक सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत. रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना घरबसल्या आॅनलाईन तिकीट काढण्याची सोय आहे. यासाठी प्रवाशाला स्वत:च्या आॅनलाईन खात्याचा वापर करणे बंधनकारक आहे. मोहिमेचा भाग म्हणून भंडारा येथे मंडळ आयुक्त आशुतोष पांडे, सहाय्यक सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांच्या निदेर्शानुसार भंडारा रोड आर. पी. एफ. ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. यावेळी भंडारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण उपस्थित होते. भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौक कॉलेज रोड स्थित मे .एम. एस. एम. एस. सर्व्हिसेस दुकानात धडक कारवाई करण्यात आली. यावेळी दुकानाचे चालक मो. सिराज अहमद शेख याच्याशी चौकशीदरम्जान त्याने पथकाला उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी शेख हा वैयक्तिक ई मेल आयडीवरून तात्काळ तिकीट काढल्याचे निदर्शनास आले.कारवाईदरम्यान उपनिरीक्षक बी. के., सिंग, उपनिरीक्षक जय शिंग, सहायक उपनिरीक्षक ओ सी. शेंडे , शिपाई रितेश देशमुख, कृष्णा सावरकर उपस्थित होते. ही कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.
रेल्वे आरक्षणाच्या अवैध तिकीट अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:45 AM
रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या व आरक्षणासाठी होणाऱ्या धडपडीचा फायदा घेऊन दलालामार्फत ग्राहकांना लक्ष्य बनविले जाते. असाच प्रकार गुरूवारी उघडकिला आला. गुप्त माहितीच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौकातील कॉलेज मार्गावर असलेल्या एका दुकानात रेल्वे आरक्षणाच्या अवैध तिकीट अड्डयावर धाड घातली.
ठळक मुद्देएकाला अटक । ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, रेल्वे पोलिसांची कारवाई