कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एस. राव होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून योग फाॅर युवर सेल्फ संस्थेच्या संचालिका योगाचार्य सुजाता सुहास कुलकर्णी व ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी उपस्थित होते. योगाचार्य सुजाता कुलकर्णी यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद करून सध्याच्या परिस्थितीत नियमित योगा करणे महत्त्वाचे असल्याचे मार्गदर्शन केले. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगासन, प्राणायाम, ध्यान यांचे महत्त्व पटवून दिले. योगाचार्य सुजाता सुहास यांनी ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी आसने, शरीर शितलीकरण, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक दाखवले. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी साधे साधे उपाय सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. राव यांनी मानवी जीवनात आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येकाने निरोगी आयुष्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचा आहे असे सांगितले. सुदृढ शरीरासाठी भावी शिक्षकांनी आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले. प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नांचे कुलकर्णी यांनी निरसन केले. संचालन प्रा. सुनंदा आंबिलकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. मृणाल माकडे यांनी तर आभार प्रा. किरण येळणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. भावना डुंभरे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
अनुराग महाविद्यालयात योग प्रशिक्षण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:22 AM