लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन व मिलन म्हणजे योग अशी योगाची परिभाषा सांगून प्राचीन काळापासून योग विद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वेळी केले.जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, आय.एन.ओ. गुलाबबाबा योग प्राकृतिक चिकित्सालय व प्रशिक्षण केंद्र,युवा भारत,लायन्स क्लब, किसान सेवा समिती,जिल्हा योग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आज चतुर्थ योग दिनाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड. उज्वल निकम होते. प्रमुख पाहूणे म्हणून उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे,जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, नेहरु युवा केंद्राचे रमेश अहिरकर, महिला पतंजली राज्य कार्यकारीणी सदस्य गिताताई इलमे, आय.एन. ओ. समन्वयक भगवान मस्के, भारत स्वाभिमान न्यासचे कोषाध्यक्ष किशोर श्रीरंग, लॉयन्स क्लबच्या कोषाध्यक्ष इंदीरा काबरा, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, जिल्हा महिला प्रभारी संध्या बांते उपस्थित होते.उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी व्यक्तीच्या शारिरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या महत्वपूर्ण असून सामान्य नागरिकांमध्ये योगाप्रती जागरुकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविकातून डॉ. रमेश खोब्रागडे यांनी योगाचा इतिहास व महत्व विशद केले. योगमय वातावरणात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घेवून योग विषयक माहिती जाणून घेतली.योग अभ्यास शिबीरात ग्रिना, चालन, स्कंध संचालन, स्कंध चक्र, कटी चालान्ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, मरीचासन, भुजंगासन, सेतुबंधासन, उत्तान पादासन, अर्धहस्तासन पवन मुक्तासन, शवासन, अनुलोम-विलाम, कपालभाती, भ्रामरी प्राणायम, शितली प्राणायाम, व ध्यान इत्यादी योग व प्राणायामाचा या कार्यक्रमात अभ्यास करण्यात आला. ही आसने गिता इलमे यांनी शिकवली.संचालन व उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी लाखांदूरचे तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, मंगेश गुडधे, रविंद्र वाळके, सुरज लेंडे, राम घुडसे, वसंता पाल, संतोष शर्मा, स्नेहल तिडके, कांचन ठाकरे, चेतन झंझाड, डॉ. सुलभा मस्के, व इतर समित्यांचे सहकार्य लाभले.
शरीर, मन व आत्मा यांचे मिलन म्हणजे योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:55 AM
शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन व मिलन म्हणजे योग अशी योगाची परिभाषा सांगून प्राचीन काळापासून योग विद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वेळी केले.
ठळक मुद्देउज्ज्वल निकम : जिल्हयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात