सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्रात १०० एनजीओच्या माध्यमातून शंभर ठिकाणी योग यज्ञाचे कार्यक्रम ऑनलाइन प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रसारित करून एकाच वेळेला शंभर ठिकाणी सुरुवात करण्यात आली. महा एनजीओ फेडरेशनचे शेखर मुंदडा यांच्याद्वारे कार्यक्रमाची रूपरेखा सांगण्यात आली. त्यानंतर देशभक्ती गीतांचे प्रस्तुतीकरण आर्ट ऑफ लिविंग चे अंकित बत्रा यांच्या द्वारे प्रस्तुत करण्यात आले. शिबिरामध्ये श्री श्री रविशंकर यांच्या बेंगलोर येथील आश्रमातील तज्ञ योग प्रशिक्षिका रुची सुद यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. सदर कार्यक्रमाला कृती रूप देण्यासाठी ग्रामपंचायत पिट्टेसूरचे सरपंच गुरुदेव भोंडे तसेच दीपक घोडीचोर यांनी योग यज्ञ शुभारंभसाठी महापुरुषाची प्रतिमेचे पूजन करून सुरुवात केली. योग यज्ञाचे संयोजन हितेंजु बहुद्देशीय संस्था तुमसर चे संचालक धमलेस अनिरुध्द सांगोडे यांच्या द्वारे करण्यात आले. प्रस्तावना गणेश बाकले यांनी केली आभार प्रदर्शन मुकुंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला अनिल राऊत, रवींद्र नागपुरे, राजेश शेंबरे, दिवानजी राऊत, डोमा भोंडे, मच्छिंद्र राऊत, पंचम भोंडे, रोहित राऊत, नितीन राऊत, पंचम भोंडे, तेजराम , गणेश शेमरे, यांनी सहकार्य केले.
योग दिनानिमित्त हितेंजू संस्थेमार्फत योग यज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:23 AM