तीन दिवसीय कार्यक्रम : दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानभंडारा : अखिल भारतीय स्तरावर कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याकरिता व त्या माध्यमातून प्रशिक्षणानंतर जनतेमध्ये जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनेची माहिती करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नावे प्रशिक्षण महाअभियानाचा कार्यक्रम दिलेला होता. त्याचाच भाग म्हणून भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा तीन दिवसीय प्रशिक्षण तुमसर येथे पार पडले.शिबिराचे उद्घाटन प्रदेश महामंत्री डॉ.रामदास आंबटकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी होते. मंचावर तुमसरचे आमदार चरण वाघमारे, भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरे, साकोलीचे आमदार बाळा काशीवार, माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ.प्रकाश मालगावे, संजय गजपुरे, डॉ.युवराज जमईवार, वामन बेंदरे, राजेश बांते, इंद्रायणी कापगते, हेमंत देशमुख, चैतन्य उमाळकर, रेखा भाजीपाले, गीता कोंडेवार, महामंत्री प्रदीप पडोळे, भरत खंडाईत, प्रशांत खोब्रागडे, कुंदा वैद्य, निशिकांत इलमे, धनपाल उंदिरवाडे, प्रल्हाद भुरे, हरिश्चंद्र बंधाटे, कविता बनकर, निलीमा हुमने, शिवराम गिरीपुंजे, नेपाल रंगारी, बिसन सयाम, आबिद सिद्धीकी, मिलींद धारगावे उपस्थित होते. ‘निवडणूक व्यवस्थापन’ या विषयावर डॉ.प्रकाश मालगावे यांनी मार्गदर्शन केले. मीडिया प्रबंधन व सोशल मीडिया यावर जयंत शुक्ला, भाजपचा इतिहास व विकास या विषयावर जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, आमचा विचार परिवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर नचिकेत पिंपळापुरे यांनी केले. या सत्रानंतर विशेष सत्र केंद्र शासनाच्या योजनांची माहिती यावर खासदार नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्ता व्यक्तीमत्व विकास यावर आमदार गिरीश व्यास, सरकारची उपलब्धता यावर आमदार बाळा काशीवार, जिल्ह्यातील समस्या व आव्हाने याविषयावर आमदार चरण वाघमारे, आपली कार्यपद्धती आणि कार्यकर्ता संघटन यावर डॉ.उल्हास फडके, एकात्म मानव दर्शन याविषयावर आशुतोष पाठक, सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावर दयाशंकर तिवारी यांनी मार्गदर्शन केले.समारोपीय सत्रात विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांचे अध्यक्षतेखाली प्रदेश चिटणीस आमदार अनिल सोले यांनी मार्गदर्शन केले. तीन दिवसीय सत्रातून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाजात जाऊन भारतीय जनता पार्टीचा विचार व केंद्र शासन, राज्य शासनाचे निर्णयाची माहिती जनतेला करून देण्याचे आव्हान करण्यात आले. तीन दिवसीय सत्राचे संपूर्ण नियोजन जिल्हा महामंत्री प्रदीप पडोळे यांनी केले. संचालन प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.युवराज जमईवार यांनी तर वक्त्यांचा परिचय अंगेश बेहलपांडे यांनी करून दिले. आभारप्रदर्शन शिबिरप्रमुख प्रा.हेमंत देशमुख यांनी केले. शिबिराकरिता प्रदीप पडोळे, प्रशांत खोब्रागडे, विजय जायस्वाल, कैलाश पडोळे, विक्रम लांजेवार, शैलेश मेश्राम, राजू गायधने, महेंद्र कोडेवार यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)
तुमसरात भाजपचे प्रशिक्षणवर्ग
By admin | Published: August 02, 2016 12:41 AM