लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाअंतर्गत जिल्हा मुख्यालयासह अन्य बसस्थानकातील स्वच्छता करण्याची मोहीम महात्मा गांधी जयंती दिनी राबविण्यात आली. मात्र याला भंडारा जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार प्रशासनाला काहीसा विसर पडल्याचे जाणवले. भंडारा व पवनी येथील मोहीम राबविली असली तरी साकोली व तुमसरात मात्र या मोहिमेला तिलांजली देण्यात आली. विशेष म्हणजे मोहीम राबविल्याचा कांगावा करण्यात आला हे उल्लेखनिय.जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी व साकोली हे चार आगार आहेत. महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व बसस्थानक - आगाराची स्वच्छता करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी मोहिम राबविण्याचे ठरले होते. या संदर्भात सर्वच आगारातील बसेसही स्वच्छ करुन आगार व बसस्थानकाची स्वच्छता करण्यात येणार होती.या संदर्भात भंडारा येथील मुख्य बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहिम राबविल्याचे दिसून आले. मात्र दुपारनंतर प्रवाशांनीच बसस्थानक परिसरात कचरा केल्याचे दिसून आले. प्रशासन सतर्क असले तरी प्रवाशांचे सहकार्य मिळाले नाही.पवनी : परिवहन महामंडळाच्या पवनी आगारातर्फे सोमवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात आगार व्यवस्थापक गौतम शेंडे, वाहतूक निरीक्षक व बसस्थानक प्रमुख मीनल लोणारे, आगार लेखाकार दिनकर गोमासे, प्रशासन लिपिक ज्ञानेश्वर शिवरकर, मनीषा तुळसकर, माधुरी ढवळे, वाहतूक नियंत्रक निलेश बारापात्रे, राजेंद्र रायपुरकर, कविता काटेखाये, मोहन राठोड, यांत्रिक दिलीप भोगे, गुरुदेव कांबळी, हिवराज सलामे, रमेश शिंपी, विनोद पिल्लारे, चालक दुर्योधन जिभेकाटे, रामचंद्र रोहनकर, अविनाश चन्ने इ. चालक वाहक यांत्रिक व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.साकोली : जिल्ह्यातील उपविभागाचा दर्जा असलेल्या साकोली शहराच्या बसस्थानकात स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडाला. बसस्थानक परिसरात कुठेही स्वच्छता केल्याचे दिसून आले नाही. कार्यालय परिसर ते फलाटापर्यंत कचरा दिसून आला. प्रसाधन गृहाच्या भागातही अस्वच्छता दिसून आली. एकंदरीत साकोली आगारातर्फे या स्वच्छता मोहिमेला पाठ दाखविली की काय? असे स्पष्ट दिसून आले.तुमसर : परिवहन महामंडळाला अधिकाधिक महसूल उपलब्ध करुन देणाºया तुमसर आगारात व बसस्थानक परिसरात अस्वच्छता दिसून आली.विशेष म्हणजे याबाबत आगार प्रमुखांनी स्वच्छता केल्याचे सांगितले असले तरी बसस्थानक परिसरातील दृष्य अस्वच्छतेची ग्वाही देत होते. वाढलेले झाडीझुडपी व त्या लगत साचलेला काडीकचरा स्पष्टपणे दिसत होता. यात प्रवाशांनीही चांगलीच भर घातल्याचे दिसले. एकंदरीत तुमसर आगार विभागही स्वच्छतेच्या बाबतीत माघारलेला दिसला.
तुमसर, साकोलीत स्वच्छतेचा रापमंला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:27 PM
राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाअंतर्गत जिल्हा मुख्यालयासह अन्य बसस्थानकातील स्वच्छता करण्याची मोहीम महात्मा गांधी जयंती दिनी राबविण्यात आली.
ठळक मुद्देमहामंडळाच्या आदेशाला खो : पवनी, भंडारा बसस्थानकात राबविली स्वच्छता मोहीम