वैमनस्यातून घडली घटना : दोन्ही आरोपींना राहत्या घरून अटकतुमसर : दोन ट्रकचालकांनी चारचाकीत बसवून दुसऱ्या ट्रक चालकाला शहराबाहेर निर्जनस्थळी नेऊन त्याचा निर्घृण खून केला. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले. ही घटना बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तुमसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजेश सुधाकर कुंभलकर (२८) रा. दत्तात्रय नगर तुमसर असे मृत चालकाचे नाव आहे. कोमल एकनाथ बडवाईक (२३) रा.पारडी नाका नागपूर व अतुल सुरेश भुते (२४) रा.सावनेर खापा, तुमसर अशी आरोपींची नावे आहेत. मृतक राजेश कुंभलकर हा स्थानिक गॅस सिलिंडर कार्यालयात चार चाकीचा चालक होता. दोन्ही आरोपी ट्रक चालविण्याचे कामे करायचे. बुधवारी रात्री दोन्ही आरोपींनी एका चारचाकी वाहनातून राजेशला बसवून शहराबाहेरील हसारा रोड येथे ते तिथे दोन्ही आरोपींनी राजेश्वर लोखंडी रॉडने प्रहार केला. यात घटनास्थळीच राजेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले. यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवित दोघा आरोपींना शिताफीने अटक केली. गुरुवारी सकाळी तुमसर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना त्यांच्या घरुन अटक करुन त्यांच्याविरुद्ध भादंवि ३०२, २४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बोरूडे, पोलिस निरीक्षक किशोर गवई यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश हरवरे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)सुपारी किलरचा समावेशतुमसर शहर संवेदनशिल मानले जाते. दर अडीच ते तीन महिन्यात येथे खूनाचे सत्र सुरु आहे. जून्या वैमनस्यातून आॅगस्ट महिन्यता नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. बुधवारी रात्री राजेश सुधाकर कुंभलकर या युवकाची हत्या जून्या वैमनस्यातून करण्यात आली. कुठे भाडोत्री व सुपारी देऊन हत्या करण्यात आली तर बुधवारी करण्यात आलेला खून परगाववासीयांनी केला. शहरात असामाजिक तत्व वाढले काय? हा संशोधनाचा विषय आहे.
तुमसरात ट्रकचालकाचा निर्घृण खून
By admin | Published: December 25, 2015 1:32 AM