शिवसैनिकांना अटक व सुटका : तुमसर - गोंदिया महामार्ग रोखला लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : देव्हाडी क्षेत्रातील नागरिकांना विजेचा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्याची सुरूवात होऊनही उपकरणांची निगा व दुरुस्ती न झाल्यामुळे विद्युत पुरवठा १० ते १५ तास खंडीत होण्याचे प्रकार घडत होते. यातून नागरिकांची सुटका करून सुरळीत वीज पुरवठा करावा, या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्त्वात तुमसर-गोंदिया महार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. देव्हाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांना नियमित पाणी पुरवठा करीत नसून ते आठवड्यातून तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात होता. नागरिकांनी याबाबत विचारले असता, पाण्याची पातळी कमी झाली असून ग्रामवासींयाना नियमित पाणीपुरवठा करु शकत नाही, असे ग्रामपंचायतकडून सांगण्यात येत होते. देव्हाडी गावातील नेहरू वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात कुकुटपालन केंद्र सुरू असून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी कुकुट पालन बंद करुन गावाचा बाहेर नेण्याकरिता अनेकदा पत्र दिले होते. ग्रामपंचायतमध्ये हा ठराव मंजूर झाला होता. परंतु त्या ठरावावर ग्रामपंचायत कारवाई करू शकली नाही. हा विषयही आजच्या आंदोलनात होता. आंदोलनास्थळी विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता देवघडे, सरपंच रिता मसरके, ग्रामपंचायत सचिव बावनकुळे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दरम्यान कुक्कुटपालन दुकानाविषयी ग्रामस्थांत रोष दिसून आला. एकीकडे शासन स्वच्छता अभियान राबवितात आणि दुसरीकडे दुर्गंधी हा प्रकार अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना अटक करुन त्यांना तुमसर पोलीस ठाण्यात नेले त्यानंतर त्यांची सुटका केली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, शिवसेनेचे पदाधिकारी शिवप्रसाद लिल्हारे यांनी केले. या आंदोलनात वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश पांडे, अमित मेश्राम, नरेश उचिबघले, नितीन सेलोकर, कामगार सेनेचे मनोहर जांगळे, जगदीश त्रिभुनकर, कृपाशंकर डहरवाल, आलम खान, बाला रेड्डी, महिपाल बसिने, पवन खवास, विक्रांत तिवारी, राजू ठाकूर, मोनू तिवारी, सौ. इंदूताई लिल्हारे, शेखर बंनाटे, रोहित बसिने, योगराज टेंभरे, परमभूषण शामकुवर, नरेश टेंभरे, शेखर ठवकर, अभिजित बोरकर, बंटी दवारे, मुज्जू बेग, वसंत नागपुरे, ए. डी. खान, लोकेश बिरणवारे, दीपक काळे, गणेश पारधी, संतोष डुंगरी गोल्डी लिंगायात, योगश नागपुरे, ईश्वर भोयर, कमलेश बिरनवारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
तुमसरात शिवसेनेचा ‘रास्ता रोको’
By admin | Published: July 07, 2017 12:46 AM