शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

तुम्हीच सांगा, उत्पादन खर्चाधारीत शेतमालाला भाव कोण देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:17 IST

शेतकऱ्यांचा प्रश्न : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सर्वत्र झपाट्याने बदल होत असताना शेतकऱ्यांचे दिवस पालटताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने त्यांच्या मुलांना मुली मिळेनाशा झाल्या आहेत. शेतमालातून उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. ही दैन्यावस्था बदलण्यासाठी योजनांसह शेतमालाला उत्पादन खर्चाधारित भाव मिळावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठमोठी आश्वासने देण्यात येतात. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही शेतकऱ्यांसाठी आजवर कोणत्याही सरकारने पाहिजे तसे सकारात्मक निर्णय घेतले नाहीत. तसेच लागवड खर्चानुसार शेतमालाला भाव मिळावा, एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तीही पूर्ण केली जात नाही. 

ऐकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात येते. शेतमालाला उत्पादन खर्चाधारित हमीभाव देण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. 

निव्वळ जुमलेबाजी होत असल्याची समज आता शेतकऱ्यांना आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाहीत, ही शेतकऱ्यांची खरी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी आता सर्वस्तरातून होत आहे. 

धानाला मिळणारा हमीभाव तुटपुंजा "यंदा कीड व रोगांमुळे गतवर्षीच्या तुलनेत धान पिकाचे उत्पादन कमी झाले. परंतु ज्याप्रमाणे महागाई वाढली त्या तुलनेत धानाला हमी भाव दिला जात नाही. महागाई आसमंतात गेली. धानाचे दर मात्र अद्यापही जमिनीवर आहेत. नैसर्गिक आपत्तीत मदतही तुटपुंजी दिली जाते. उत्पादनातून उत्पादन खर्च सोडा , घेतलेल्या कर्जाचा बोजाही उतरविणे कठीण झाले आहे." - श्रीकांत डोरले, शेतकरी

पीकविमा योजना मृजगळ "शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचा विमा काढला. परंतु प्रत्यक्षात ही योजना विमा कंपन्यांना करोडोंचा मुनाफा कमविण्यासाठीच असल्याची भावना शेतकऱ्यात आहे. नुकसान होऊनही विमा लागू करण्याच्या क्लिष्ट नियमांमुळे शेतकऱ्यांना क्लेम मिळताना दिसत नाही." - विलास पचघरे, शेतकरी

केवळ घोषणा नकोत, प्रत्यक्ष काम व्हावे "शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दीडपट हमी भाव, संपूर्ण कर्जमाफी आदी आश्वासनांची खैरात वाटली जाते. परंतु एकही आश्वासन निवडणुका जिंकताच पूर्ण केल्या जात नाही. यामुळे शेतकरी हतबल आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठविताच त्यांचा आवाज शासकीय यंत्रणांच्या प्रभावात दडपला जातो. यामुळे शेतकरी पुर्णतः खचला आहे." - रामभाऊ नेरकर, शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा