लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्या समाजघटकासाठी काेणतेही महामंडळ नाही अशा मराठा व ब्राह्मण समाजातील ८ लाख मर्यादित वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबीयांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळमार्फत कर्ज व्याज परतावा याेजना राबविण्यात येते. महामंडळामार्फत विविध उद्याेग धंदा सुरू करण्यासाठी व व्यवसाय वाढीसाठी तरुणांना बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. मिळणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करून आर्थिक बाेजा कमी करणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा याेजना, गट कर्ज व्याज परतावा याेजना, गट प्रकल्प कर्ज याेजना आदी तीन याेजना राबविल्या जातात. या अंतर्गत २५ लाख, ३५ लाख, ४५ लाख, ५० लाखापर्यंतचे कर्ज महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते. तर पात्र शेतकरी, उत्पादक कंपनी यांना बिनव्याजी दराने कर्ज रकम उद्याेगांकरिता दिले जाते.
८३.७२ लाखांचा व्याज परतावामहामंडळाचे वतीने दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर बॅंकेमार्फत जमा केली जाते. आतापर्यंत १३७ तरुणांना ८३ लक्ष ७२ हजार ५८७ रुपयांचा व्याज परतावा करण्यात आला आहे.
कर्जासाठी येथे करा अर्जया महामंडळाच्या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. वेबसाईट https://udyog.mahaswayam.gov.in यावर ऑनलाईन अर्ज करता येईल.
१३७ तरुणांना ६.३५ काेटींचे वाटपमहामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अंतर्गत १०४ लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले हाेते. त्यापैकी १३७ लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने बॅंकेमार्फत वैयक्तिक ६ काेटी ३५ लक्ष ४० हजार २२० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. यात १० लाख, ५ लाख, ७ लाख कर्जाचा समावेश आहे.
निकष काय- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा- ज्या प्रवर्गासाठी महामंडळ नाही असे पात्र उमेदवार. वयाेमर्यादा : पुरुषांसाठी वय १८ ते ५० वर्ष. महिलांसाठी १८ ते ५५ वर्ष.- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असावे. उमेदवार मराठा व ब्राह्मण समाजाचा असावा.
कागदपत्रे काय लागणार?
आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा आयटीआर पती,पत्नी यांचे ८ लाख रुपयांच्या उत्पन्न प्रमाणपत्र.जातीचा दाखला किंवा शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेट आदी कागदपत्रे अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे.
तरुणांनाे उद्याेजक बना
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे वतीने होतकरू निर्धारित तरुणांना उदयोग व व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. तीन योजनांतून लाभ दिला जातो. तरुणांनी स्वयंरोजगार व उदयोग उभारणीसाठी योजनांचा लाभ घ्यावा. तरुणांनी उद्याेजक हाेवून प्रगती साधावी.- सुहास बोंदरे,जिल्हा समन्वयक अधिकारी, भंडारा