मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहराला बायपास रस्ता नाही. त्यामुळे तुमसर- कटंगी तथा वाराशिवनी आंतराज्यीय रस्ता शहरातून जातो. मागील काही वर्षात या रस्त्यावर जड वाहतूक वाढती भर शहरातील मुख्य रस्त्यावरुन यमरुपी ट्रकांची सर्रास एन्ट्री होत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. श्रीमंत नगरी म्हणून नोंद असलेल्या शहराकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.तुमसर शहर रेल्वे ट्रॅकमुळे दोन भागात विभागले आहे. श्रीराम नगर हे शहराचे प्रवेशद्वार आहे. अर्धी लोकसंख्या श्रीराम नगर, विनोबा नगर, दुर्गा नगर, ते भंडारा मार्गावर नागरिकांची घरे आहेत. भंडारा-तुमसर राज्य मार्ग शहरापर्यंत येतो पुढे हा रस्ता कटंगी व वारासिवनी (मध्यप्रदेश) कडे जातो. सदर रस्त्यावरुन चोवीस तास जड वाहतूक सुरू असते. यात रेती, मॅग्नीज तथा इतर साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांचा समावेश असतो. सकाळी ९.३० ते १२ व सायंकाळी ४ ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत या रस्त्यावरुन जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. बसस्थानक, बँका, शाळा, कॉलेज, खाजगी रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय मार्गावर आहे.विनोबा भावे मार्गावर देव्हाडी मार्गाने भंडारा मार्गावर जाण्यासाठी रस्ता आहे, परंतु वारासिवनी व कटंगी कडून येणारा वाहनाला बायपास रस्ता नाही. सिहोरा ते मºहेगाव रस्ता असा बायपास रस्ता मंजूर होणार आहे. परंतु शेवटी ही वाहतूकही आयटीआय मार्गे शहरातून जाणार आहे. मºहेगाव रस्ता ते हसारा दरम्यान रेल्वे ट्रॅक आहे. दुसरा बायपास रस्त्याला रेल्वे ट्रॅक अडसर ठरत असल्याची माहिती आहे. हा अडथळा दूर झाल्याशिवाय शहरातूनच जड वाहतूकीचे ट्रक धावणार आहेत.दिवसेंदिवस शहरात लोकसख्येसोबत वाहनांची संख्या वाढत आहे. आता सुरक्षित प्रवासाकरिता शहराला बायपास रस्त्याची नितांत गरज आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ४५ हजार आहे. भंडारा रस्त्यावर तुमसर शहर वाढत आहे. शहरातून ट्रकांची एन्ट्री दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. परंतु आंतरराज्यीय मार्गाला दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचाही नाईलाज आहे.शहरातून जड वाहतुकीदरम्यान पालकांना आपल्या पाल्यांची नेहमी चिंता सतविते. शहरातील रस्त्यावरुन ट्रक वाहतुक मात्र मर्यादित वेगात राहते. शेवटी अपघात वेळ आणि काळ सांगून येत नाही. बायपास रस्ता हाय एकमेव पर्याय येथे आहे.
अवजड वाहनांना तुमसरात बिनधास्त ‘एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 9:52 PM
तुमसर शहराला बायपास रस्ता नाही. त्यामुळे तुमसर- कटंगी तथा वाराशिवनी आंतराज्यीय रस्ता शहरातून जातो. मागील काही वर्षात या रस्त्यावर जड वाहतूक वाढती भर शहरातील मुख्य रस्त्यावरुन यमरुपी ट्रकांची सर्रास एन्ट्री होत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. श्रीमंत नगरी म्हणून नोंद असलेल्या शहराकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
ठळक मुद्देआंतरराज्यीय मार्ग शहरातून : बायपास रस्त्याला रेल्वेचा अडथळा