संचारबंदीमुळे आपापल्या घरी असलेले चार मित्र एकत्र येऊन पार्टी करायची म्हणून त्यांनी कालीसरार धरणावर पार्टी करण्याचा चंग बांधला. परंतु पार्टी करण्यासाठी धरणावर गेलेल्या चार मित्रांपैकी एक मित्र आंघोळ करण्यासाठी धरणाच्या ओव्हरफ्लो खाली उभा झाला. परंतु त्यावरून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेवाळ तयार झाले होते. त्या शेवाळावरून त्याचा पाय घसरल्याने २५ ते ३० फूट खोल असलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. अमित सोबत गिधाडी येथील मुकेश हरिणखेडे (२७), पिपरीया येथील दिनेश उईके (२९) व आलेबेदर येथील फुलीचंद मरस्कोल्हे (३५) हे होते. पार्टी करण्याच्या अगोदरच ही घटना घडल्याने त्यांची पार्टी होऊ शकली नाही.
मृतक अमित जनबंधूचा मृतदेह शोधताना सायंकाळ झाली तरीही त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता. अंधार झाल्यामुळे बुधवारी त्याचा मृतदेह शोधण्यात येणार आहे असे सालेकसाचे ठाणेदार प्रमोदकुमार बघेले यांनी सांगितले आहे.