लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : वेल्डींगचे दुकान बंद करण्याच्या लगबगीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लाखनी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.तामेश्वर उर्फ गोलू सुरेश बावनकुळे (२१) रा. प्रभाग क्र. २ लाखनी असे मृताचे नाव आहे. तो लाखनी येथील एका वेल्डींग वर्कशॉपमध्ये कामाला होता. सोमवारी रात्री दुकान बंद करण्याच्या गडबडीत अनावधानाने वीज प्रवाहित वायरला स्पर्श होऊन लागलेल्या शॉक लागून खाली पडलेल्या युवकास ग्रामीण रुग्णालयात नेले. उपचारार्थ नेले असता कर्तव्यावरील डॉक्टरने मृत घोषित केले. तामेश्वरच्या वडीलांचे निधन झाले होते. लाखनी येथील विराट वेल्डींगच्या दुकानात रोजंदारीवर तो तीन वर्षापासून कामाला होता. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास रात्री उशिरा दुकान बंद करण्याच्या लगबगीत अनावधानाने हातातील लोखंडी पत्राचा जीवंत वायरला स्पर्श झाल्याने विद्युतचा शॉक लागून घटनास्थळीच कोसळला. त्याला वेळीच उपचारार्थ लाखनी ग्रामीण रुग्णालयात दुकान मालक विराट गायधनी घेऊन गेले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेची माहिती एका सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष तथा तामेश्वरचे काका अनिल बावनकुळे व शिष्टमंडळानी ग्रामीण रुग्णालय गाठले. तसेच या घटनेची तक्रार लाखनी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने तामेश्वरच्या परिवाराला तात्काळ १० लाख रुपयांची मदत करण्याची माणगी नातेवाईकांसह सामाजिक संघटनाद्वारे करण्यात आली. अंत्यसंस्काराला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेचा धक्का लागून तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:19 PM
वेल्डींगचे दुकान बंद करण्याच्या लगबगीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लाखनी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देलाखनी येथील घटना : वेल्डींगचे दुकान बंद करताना घडली घटना