शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

तरुणांनो, खेळणे बनण्यापेक्षा खेळाडू बनून आयुष्य सार्थक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 6:00 AM

शैक्षणिक मागासलेपणा दुर करुन जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षण घेवून समाजातील मागासलेल्या लोकांकरिता काम करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणमन रेशीम उद्योग संचालक भाग्यश्री बानायत, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रमुख वक्ते दिलीप सोळके आदी उपस्थित होते

ठळक मुद्देवेणुगोपाल शेंडे। सानगडी येथे आयोजित प्रबोधन कार्यक्रमाचा हजारोंनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : माळी समाजाला शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणातून बाहेर काढायचे असेल तर तरुणांनी खेळण बनण्यापेक्षा खेळाडू बनून आयुष्याचे सार्थक करावे , असे प्रतिपादन सेवानिवृत्त परिवहन अधिकारी वेणुगोपाल शेंडे यांनी केले.सानगडी येथे प्रबोधन कार्यक्रम निमित्ताने तरुणांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शैक्षणिक मागासलेपणा दुर करुन जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षण घेवून समाजातील मागासलेल्या लोकांकरिता काम करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणमन रेशीम उद्योग संचालक भाग्यश्री बानायत, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रमुख वक्ते दिलीप सोळके आदी उपस्थित होतेयावेळी भाग्यश्री बानायत यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक धान शेती सोडून आर्थिक प्रगतीसाठी किमान एक एकर तरी रेशीम उद्योग उभारावा, असे आवाहन केले. पारंपारिक धान शेतीपेक्षा रेशीम शेतीतून पाच पट अधिक उत्पादन मिळते याची त्यांनी उदाहरणाद्वारे खात्री दिली.अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे म्हणाले, समाजबांधवांनी समाजकारणासोबत राजकारणाकडे वळून प्रगतीची दारे ज्या संसदेतून किंवा विधानसभेतून उघडली जातात, त्याठिकाणी प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी प्रयत्न केला तरच समाजाची प्रगती अधीक वेगाने होऊ शकते, अशी आशावादी भूमिका मांडली. याप्रसंगी जनार्धन लोथे स्मृती पुरस्काराने मीनल गोटेफोडे, दिशा खर्डेकर, साक्षी गोटेफोडे, अश्विनी राऊत, भाग्यरी उके, शिवानी इरले, प्रतीक बाचलकर यांना गौरविण्यात आले.संचालन माणिक खर्डेकर, प्रा. नाजुकराम बनकर यांनी तर, आभार प्रदर्शन विहिरगावचे सरपंच रविंद्र खंडाळकर केले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ बनकर, विजय खंडाळकर, दीपक उपरीकर, मनोहर नगरकर, मनोहर गोविंदा इटवले, वासुदेव नगरकर, मनोहर ईटवले, रविशंकर लोथे, धनराज लोथे, मुनीश्वर उपरिकर, जनार्धन डोंगरवार, चंद्रहास खंडाळकर, चुन्नीलाल लोथे, नरेश खर्डेकर, मोहन चोपकर, विनोद शेंडे, श्रीराम राऊत, धनीराम सावरकर, अनिल बारस्कर, संगीता बारस्कर, राजीराम ईटवले, शालीक खर्डेकर, खुशराम किरणापुरे, विनायक भुसारी, वासुदेव गायधने, रुपराम इटवले आदीनी सहकार्य केले.माळी समाजाचा स्तुत्य उपक्रमसानगडी येथे गत तीन वर्षांपासून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील अंधश्रध्दा, वाईट चालीरिती यांच्यावर घाणाघाती प्रहार करुन त्या कशा चुकीच्या आहेत, हे अनेक उदाहरणाद्वारे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दिलीप सोळके यांनी पटवून दिले.यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.