लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : तरुणांनी मैदानी स्पर्धांना जीवनात महत्त्व देऊन त्यामध्ये प्राविण्य मिळविल्यास शरीर मजबूत होण्यास मदत होते. कबड्डी देशी खेळ आहे. याचा वारसा सर्वांनी जपून या खेळाचे महत्त्व ओळखावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.शहीद मेजर प्रफुल्ल अंबदास मोहरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजमुद्रा क्रीडा व सामाजिक मंडळ कोंढा यांच्यावतीने कबड्डी व मॅराथान स्पर्धा पार पडली. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी खासदार मधुकर कुकडे, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय दलाल, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, माजी सरपंच गंगाधरराव जिभकाटे, आशिष माटे, सरपंच डॉ. नुतन कुर्झेकर, पवनी राकाँ तालुकाध्यक्ष लोमेश वैद्य, पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, विजय काटेखाये, प्रशांत भुते, पंढरी सावरबांधे, हरबन्सलाल मक्कड, शैलेश मयूर, पोलीस पाटील वैशाली जिभकाटे, केशव मोहरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी खासदार मधुकर कुकडे यांनी सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. या शासनाच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. धान व इतर रबी पिकांना भाव नाही. येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, असे प्रतिपादन केले.तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेच्या रणसंग्रामात नागपूर विभागातून अनेक टीम आलेल्या आहे. प्रथम बक्षीस २२,२२२ रुपये, द्वितीय बक्षीस १५,५५५ रुपये, तृतीय बक्षीस ९,९९९ रुपये देण्यात येणार आहे.कार्यक्रमासाठी राजमुद्रा क्रीडा व सामाजिक मंडळाचे ऋषी सुपारे, अविनाश जिभकाटे, नागेश जिभकाटे, युगल सेलोकर, शुभम मोहरकर, गणेश मोहरकर, अंकित हटवार, लोकचंद जिभकाटे, विलास जांभूळकर, महेश जिभकाटे, पंकज वंजारी, प्रतिक हटवार, अंकित कुर्झेकर, रुपवंता जिभकाटे, नागेश जिभकाटे सहकार्य देत आहे. संचालन सुधीर माकडे यांनी तर प्रास्ताविक अध्यक्ष विलास गिरडकर यांनी केले. आभार प्रतीक हटवार यांनी मानले.
तरुणांनी मैदानी स्पर्धांना जीवनात महत्त्व द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:05 PM
तरुणांनी मैदानी स्पर्धांना जीवनात महत्त्व देऊन त्यामध्ये प्राविण्य मिळविल्यास शरीर मजबूत होण्यास मदत होते. कबड्डी देशी खेळ आहे. याचा वारसा सर्वांनी जपून या खेळाचे महत्त्व ओळखावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कोंढा येथे कबड्डी व मॅरेथॉन स्पर्धा