इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एक नव्हे, दोन नव्हे चक्क तरूण-तरूणींच्या चमुने वैनंगगा नदीपात्रातील निर्माल्य बाहेर काढून स्वच्छतेचा संदेश देऊ केला आहे. १५ ते २५ वयोगटातील या तरूणांच्या उमेदीनेही दुसºयांनाही स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे.स्वच्छतेचा हा उपक्रम केनोइंग आणि कयाकिंग असोसिएशनच्या खेळाडूंतर्फे राबविण्यात आला. सणासुदीच्या काळात मोठया प्रमाणात तलाव, बोळी व नदीपात्रात निर्माल्य घातले जाते. पालिका प्रशसनातर्फे तलाव किंवा नदी काठावर निर्माल्य ठेवण्याची व्यवस्था केली जाते.मात्र काही ठिकाणी नदीपात्रात किंवा तलावात निर्माल्य विर्सजित केले जाते. निर्माल्य वाहून जाता तलाव किंवा नदीकाठावर साचून राहते. परिणामी दुर्गंधीत वाढ होवून पाणीही दूषीत होते.या दूष्टीकोनातून जल शुद्धीकरणाचा हेतू समोर ठेवून केनोइंग आणि कयाकिंग असोसिएशनच्या उमद्या खेळाडूंनी हा उपक्रम राबविण्याचा चंग बांधला. याची सुरूवात कारधा वैनगंगा नदाी पात्रातून करण्यात आली.श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणपती विसर्जन यादरम्यान भाविकांनी निर्माल्यही येथे गोळा केले होते. आगामी सोमवारपासून ‘श्रीं’च्या विसर्जनला दणक्यात सुरूवात झाली.यानंतर दुर्गा उत्सवातही असाच उपक्रम राबविण्याचा मानस या असोसिएशनतर्फे व्यक्त करण्यात आला.या स्वच्छता मोहिमेत राजेंद्र भांडारकर, रमेश हजारे, गणेश मोहरकर नीता शेंडे, तापश्री बंसोड़ , प्राची शेंडे, काजल मुटकुरे ,समीक्षा लेंडारे, संजना कंगाले, अंजलि खंगार, अंकिता गोन्नाडे, निराशा सेलोटे, मुस्कान उके, खुशी हेड़ाऊ, सुधांशु सूर्यवंशी, सुधीर सारवे, रोहित पडोळे, लक्ष्मी बावनकुळे, वैभव समर्थ, वैष्णवी आजबले, सुभाष जमजारे व प्रशांत कारेमोरे या तरूण-तरूणींचा सहभाग आहे.
उमद्या तरूणांनी केला स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 10:52 PM
एक नव्हे, दोन नव्हे चक्क तरूण-तरूणींच्या चमुने वैनंगगा नदीपात्रातील निर्माल्य बाहेर काढून स्वच्छतेचा संदेश देऊ केला आहे.
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : नदीपात्रातून बाहेर काढले निर्माल्य