आॅनलाईन लोकमतलाखांदूर : हाताची नखे वाढली असल्यानंतर मातीत काम करणाऱ्या मजुरांच्या हातात मळ जमा होऊन, अन्नाद्वारे शरीरात जाते. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे मजुरांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी लाखांदूरचे खंड विकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी चक्क मजुरांची नखे काढून स्वच्छतेचा मंत्र दिला आहे.चप्राड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या पांदन रस्त्याच्या सुरु असलेल्या कामावर खंड विकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी कृषी अधिकारी वानखेडे, बी. आर. सी. कर्मचारी तऱ्हेकार, मेश्राम, तांत्रिक पॅनेल अधिकारी चांदेवार यांच्यासह भेट दिली असता कामावर उपस्थित २३७ मजुरांशी स्वच्छ व आरोग्यावर चर्चा करून, वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा वापर, मासिक पाळी व स्रियांच्या अन्य समस्या, व्यसनाधीनता मार्गदर्शन केले. त्यानंतर हात धुवा उपक्रम राबवून मार्गदर्शन केले. महिलांसाठी हळदी कुंकूचा उपक्रम राबवुन नेलकटर व साबुन वाटप केले. यावेळी सरपंच कुसुम दिघोरे, गोपाल घाटेकर, ग्राम विकास अधिकारी लोखंडे, सदस्य धनराज ढोरे, विजय खरकाटे उपस्थित होते.
मजुरांच्या बोटांची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:11 PM
हाताची नखे वाढली असल्यानंतर मातीत काम करणाऱ्या मजुरांच्या हातात मळ जमा होऊन, अन्नाद्वारे शरीरात जाते.
ठळक मुद्देखंड विकास अधिकारी यांचा अभिनव उपक्रम