जांब (लोहारा ) : कोरोना महामारीत निर्माण झालेल्या रक्ताचा तुडवडा दूर करण्यासाठी तुमसर तालुक्यातील पिटेसूर येथील सरपंच गुरुदेव भोंडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत कार्यालय व पिटेसूर युवा मंचाच्या तरुणांच्या सहकार्याने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले .या शिबिराचे उद्घाटन सरपंच गुरूदेव भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले .
आजच्या घडीला समाज जीवणावर कोरोना रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढल्याने महामारीची परिस्थिती निर्माण झाली असून यातील रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्याने निष्पाप जिवाचा बळी जात आहेत. ही खंत मनात आहे म्हणून समाजाने जे काही आपल्या दिले आहे ते आज एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही समाजाला काही देण्याची गरज आहे . याकरिता तरुणांनी रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्याचे व कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुडवडा पडत असतो. यासाठी गावातील तरुणांनी रक्तदान व प्लाझ्मा दान करण्यासाठी घ्यावा पुढाकार असे आवाहन सरपंच गुरुदेव गजानन भोंडे यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच राजकुमार इनवाते, ग्रामसेवक ललित ढोले, ग्रा.पं. सदस्य गणेश तांडेकर, विणा चौधरी, ललिता राऊत, उर्मिला शेंबरे, अतुल भिवगडे, मच्छिंद्र राऊत, दिवाकर गौपाले, राहुल तांडेकर, सुजाता कळंबे, आशा सेविका संगीता लांजेवार व नागरिक उपस्थित होते. जिल्हा सामान्य रक्तपेढी या संस्थेच्या वतीने रक्तदानाचे कार्य करण्यात आले. यावेळी धनंजय गौपाले, विरुदेव भोंडे, अरविंद कवरे, वनरक्षक अनिल बेडके, रवींद्र शिंदे, अतुल करपते, रामदास पांढरे, आकाश शिंगाडे, नितीन सरवरे, समीर कोहळे, राष्ट्रपाल भोंडे, अतुल बोंदरे, विलास सोनवणे, गणेश शेंबरे, राहुल बोंदरे या तरुणांनी रक्तदान केले. या तरूणांचा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .