लाखनी येथे उपक्रम : तरुणांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : मातोश्री बहुउद्देशीय संस्थेमार्फत स्वामी विवेकानंद वाचनालय लाखनी येथे युवा नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन रेशमा बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी रजनी मुळे तर अतिथी म्हणून रवींद्र मेश्राम उपस्थित होते.बन्सोड यांनी युवकामध्ये व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा झाला पाहिजे, त्यांना कोणत्या पध्दतीने रोजगार उपलब्ध करतात येऊ शकतो त्यांची बौद्धिक पातळी कशी वाढेल, या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या युगात स्पर्धेत कशा प्रकारे वर्चस्व गाजविता येऊ शकतो व आपले भविष्य कशा पद्धतीने घडविता येतो. कोणत्या उपयाने युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल इतक्या सहज व सोप्या भाषेत रजनी मुळे यांनी युवक युवतींना युवा नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण दिले.रवींद्र मेश्राम यांनी मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी उपस्थित युवकांना मेडिटेशन शिकविले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रिया दिलीप खंडारे यांनी केला. आभार प्रदर्शन संस्थेचे कोषाध्यक्ष उर्मिला खंडारे यांनी केले. शिबरिासाठी संगीता नंदेश्वर, तान्या खंडारे, लोकेश मसराम, मनोज तिरपुडे, उज्वला वैद्य, सीमा ऊके, लोपमुद्रा कोल्हटकर शुभम कोसरे यांनी सहकार्य केले.
युवा नेतृत्व विकास प्रशिक्षण
By admin | Published: June 30, 2017 12:36 AM