पडोस युवा संसद कार्यक्रम : अशोक लटारे यांचे प्रतिपादनभंडारा : युवापिढीने आपले ध्येय निश्चित करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करावा तर यश निश्चित मिळेल. युवकांनी आपले मार्ग स्वत: शोधावेत. आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आपला बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा. असे उद्गार अशोक लटारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भंडारा यांनी नेहरु युवा केंद्र भंडारा द्वारा आयोजित पडोस युवा संसद कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ विभागाअंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र भंडारातर्फे आठवले समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटक व प्रमुख अतिथी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे भंडारा हे होते. अध्यक्षस्थानी आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.डॉ.नरेश कोलते हे उपस्थित होते. यावेळी नेहरु युवा केंद्र भंडाराचे जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे, प्रा.बेपारी, क्रीडा मार्गदर्शक चौधरी व लेखापाल रमेश अहिरकर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना संजय माटे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. प्रा.डॉ.कोलते म्हणाले, युवापिढीने विविध क्षेत्रातील माहिती मिळवून आपले स्वत:चे योग्य क्षेत्र निश्चित केले पाहिजे. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी कठोर परीश्रम घेतले पाहिजे तरच जीवनात यशस्वी होता येईल. यावेळी क्रीडा अधिकारी मरसकोल्हे, प्रा.बेपारी, क्रीडा मार्गदर्शक चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन निखिल कान्हे यांनी तर आभार प्रदर्शन रक्षा सुखदेवे हिने केले. कार्यक्रमासाठी लेखापाल रमेश अहिरकर, आशिषकुमार मेश्राम, निकीता बोरकर, रक्षा सुखदेवे, राहुल बांते, सचिन साठवणे, मिथुन लिल्हारे, छाया मेंढे यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
युवकांनी आत्मविश्वास वृद्धिंगत करावा
By admin | Published: February 04, 2016 12:38 AM