राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आलेले अंधत्व दूर सारता येते. दृष्टीदान मिळावे, याकरिता प्रतीक्षा करणाºयांची संख्या ४६ लाखांवर पोहचली आहे. दिवसेंदिवस त्या संख्येत वाढच होत चालली आहे. मात्र मरणोपरांत नेत्रदान करणाºयांची संख्या संपूर्ण देश, राज्य व जिल्ह्यातही अतिअल्प असल्याने तुमसरातील युवकांनी येत्या पंधरवाड्यात युवकांचा मोठा सहभाग नोंदवून नेत्रदान करण्याचा वसा घेतला आहे. मनिष वैद्य, अमित क्षीरसागर, पंकज भोयर, श्रीकांत मोटघरे, शेखर साकुरे, शिरीर वैैद्य सर्व रा.तुमसर असे स्वखर्चाने नेत्रदान करणाºया युवकांची नावे आहेत.आजघडीला जगातील अंधापैकी ३० टक्के अंध भारतात आहेत. केवळ जर भारताचा विचार केल्यास १ कोटी ३० लाख व त्यापुढे अंध भारतात आहेत. या अंधापैकी जवळ जवळ २० लाख बालकांची संख्या आहे. दरवर्षी भारतात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे १५ लाख लोक आपली दृष्टी गमावतात. जे गर्भश्रीमंत लोक आहेत किंवा ज्यांची कुवत आहे ते लोक बाहेर देशातून पैशांच्या बळावर नेत्र प्रत्यारोपण करतात. मात्र ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांना मात्र प्रतीक्षा यादीत ताटकळत ठेवले जात आहे. कारण म्हणजे नेत्रदानाविषयी पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. आजही नेत्रदानाला महादान असे संबोधले जाते. परंतु रक्तदानाप्रमाणे मरणोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प जरी प्रत्येकाने केला तर नेत्र प्रत्यारोपणाकरिता कुठेही भटकावे लागणार नाही. मात्र नागरिक नेत्रदान करण्यास आवश्यक जनजागृती अभावी घाबरत आहेत. सन २०१६-२०१७ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात केवळ २५ लोकांनीच नेत्रदानाचा संकल्प केला. ही चिंतेची बाब विचारात घेऊन स्वपुढाकाराने, स्वत: प्रेरीत होऊन तुमसरच्या युवकांनी आता नेत्रदानाचा संकल्प डॉ.रवीशेखर धकाते, डॉ.लक्ष्मण फेगडकर, डॉ.सिद्धार्थ चव्हाण, नेत्रदान समुपदेशक सोनाली लांबट यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रके छापले.छोटेखानी कार्यक्रम, सभा, नुक्कड सभेचे आयोजन करून नेत्रदानाची जनजागृतीचा वसा हाती घेतला असून नेत्रदान पंधरवाड्यात जास्तीत जास्त युवकांचा व नागरिकांचा सहभाग नोंदवून जिल्ह्यात नेत्रदानाचे संकल्प करणाºयांची संख्या वाढवून जिल्ह्याची मान उंचावण्याचा मानस तुमसरातील कर्तृत्ववान युवकांचा आहे.
तुमसरातील युवकांनी नेत्रदान करण्याचा घेतला वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:14 PM
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आलेले अंधत्व दूर सारता येते.
ठळक मुद्देनेत्रदान पंधरवाडा : जनजागृतीकरिता पुढाकाराची गरज