खराशी : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर २०२० ला संपूर्ण महाराष्ट्रात बालसप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल, खराशी या शाळेच्या विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. इयत्ता ते चवथी या गटातून पत्रलेखन स्पर्धेत ऋतुजा संजयकुमार नंदूरकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता पहिली या गटात अर्ना पंकज बोरकर या विद्यार्थिनीने ‘मी नेहरू बोलतोय’ या भाषण स्पर्धेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. अर्ना व ऋतुजच्या यशाबद्दल खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारकअली सैय्यद, मुकुंदराज झलके, सहायक शिक्षक योगीराज देशपांडे, सतीश चिंधलोरे, वनिता खराबे, योगिता फटे तसेच दिलीप बोरकर, कुंदन बोरकर, रमेश रुखमोडे यांनी कौतुक केले.
जिल्हा परिषद खराशी शाळेची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:34 AM