चरण वाघमारे : जि.प. शाळेत मोफत कॉन्व्हेंटची सुरूवातलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण विद्यार्थ्यांनाही खासगी इंग्रजी शाळेसारखे शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळांचा आता दर्जा सुधारत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय होऊन त्यातून स्पर्धात्मक विद्यार्थी घडविले जातील. आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरूवात झाली असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी प्रतिपादन केले.हरदोली येथील जिल्हा परिषद शाळेत कॉन्व्हेंटचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे, सुधाकर गायधने, अंबादास झंझाड, नारायण झंझाड, मनोहर झंझाड, उपसरपंच सदाशिव ढेंगे, स्वनील माटे, बालचंद पाटील, नरेंद्र भोयर, खंडाते यांच्यासह पालकवर्ग व गावकरी उपस्थित होते. यावेळी आमदार वाघमारे यांनी, गुणवत्तापूर्ण शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून ते सर्वांना मिळावे म्हणून शासनाने शिक्षणाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आता शिक्षण हे सर्वव्यापी झाले. परंतु काळानुरूप शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे जि.प. सदस्य राणी ढेंगे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोफत कॉन्व्हेंट सुरू करून इंग्रजी शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केल्याचे प्रतिपादन वाघमारे यांनी केले.सध्या इंग्रजी शिक्षणाचे लोन सुरू असून यामध्ये गरीब व मध्यम वर्गातील पालक महागडे शिक्षण शिकवू शिकत नाही. त्यामुळे समाजातील शिक्षणात दरी निर्माण झाल्याचे राणी ढेंगे यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांची दखल घेत जि.प. शाळेमध्ये लोकसहभागातून इंग्रजी शिक्षण देण्याची योजना आखली व त्याची सुरवात जि.प. हायस्कूल आंधळगाव येथून केली. मागील वर्षापासून लहान मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून कॉन्व्हेंटची सुरवात करून केजी १ आणि केजी २ वर्गातील विद्यार्थी इंग्रजीचे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे समाजातील गरीब विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटचे शिक्षण मिळत असल्याने पालकांचाही सहभाग या उपक्रमाला मिळत आहे.
जि.प. शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ
By admin | Published: July 14, 2017 12:55 AM