लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या अद्यापही जैसे थे आहेत. त्यामुळे या समस्या मार्गी लागेपर्यंत जिल्ह्यातील शिक्षक जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध असहकार आंदोलन करणार आहेत. याबाबत शिक्षक कृती समितीच्या सभेत सर्वानुमते हा ठराव पारीत करण्यात आला.शिक्षक कृती समितीची सहविचार सभा पार पडल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत.त्यामुळे शिक्षकांवर कामांचा बोजा वाढत चाललेला आहे. त्यांच्या प्रलंबित समस्या निकाली निघेपर्यंत जि.प. शिक्षक आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकणार असून केवळ वेतन बिल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख कार्यालयीन व्हॉटसअॅप ग्रृप सोडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.सर्व पदाधिकारी व संघटना यांनी शासकीय व कार्यालयीन ग्रृप वर न राहता बाहेर पडण्याचा निर्णय या माध्यमातून घेण्यात आला. सर्व प्रलंबित कामे निकाली काढण्याची मागणी अद्यापही निघालेली नाही. त्यामुळे जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गाढवे यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे.आॅफलाईन बिलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी शिक्षकांनी केली.या सर्व समस्या मार्गी न निघाल्यास असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. या बैठकीला शिक्षक कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, युवराज वंजारी, ईश्वर ढेंगे, वसंत साठवणे, सुधीर वाघमारे, मुकेश मेश्राम, संदीप वहिले, मुकुंद ठवकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, सुधाकर ब्राम्हणकर, गिरीधारी भोयर आदी उपस्थित होते.ज्येष्ठांचा सत्कारकोंढा (कोसरा) : वैनगंगा मानवता सेवा संघ लाखनी व कोंढा गावकरी यांच्यातर्फे गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय जेष्ठांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. आनंद जिभकाटे होते. अतिथी म्हणून बे.तू. आगाशे, अध्यक्ष मानवसेवा संघ लाखनी, संयोजक ए.भ. पाखमोडे, कार्याध्यक्षता ह. भुरे, सचिव झा. म. नेवारे, सहसचिव ह.रा. मोहतुरे, स्रेही मित्रमंडळाचे अध्यक्ष प्र. सी. सोनवाने, प्रार्चा सुरेश जिभकाटे यांच्या उपस्थितीत पार पडला.
जि.प. शिक्षकांचा असहकार आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:42 PM
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या अद्यापही जैसे थे आहेत.
ठळक मुद्देशिक्षक कृती समितीने घेतला ठराव : प्रशासनाकडून केली जात आहे बोळवण