पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी विस्ताराच्या मानसिकतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:57 PM2018-10-19T13:57:55+5:302018-10-19T14:05:39+5:30

मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढविण्याचा सुर काँग्रेसच्या वर्तुळात कायम आहे. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादी  आता जागा वाटपामध्ये आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

in Western Vidarbha Nationalist congress is in aggressive mode | पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी विस्ताराच्या मानसिकतेत!

पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी विस्ताराच्या मानसिकतेत!

Next

अकोला-लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजु लागले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी  काँग्रेस आघाडीसाठी बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी काँगे्रसची असलेली स्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढविण्याचा सुर काँग्रेसच्या वर्तुळात कायम आहे. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादी  आता जागा वाटपामध्ये आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
एकीकडे काँग्रेसने आघाडीसाठी राष्ट्रवादी सोबत बैठकांचे सत्र सुरू केले असून, दूसरीकडे भारिप-बमसंचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर असोत की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजु शेटटी असतो या सर्वांशी चर्चा करून त्यांनाही आघाडीत सामावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. या सर्व पक्षांची मिळून एक महाआघाडी राज्यात स्थापन होऊ शकली, तर भाजपा विरोधात तो सक्षम पर्याय होण्याची अपेक्षा काँग्र्रेसश्रेष्ठींना आहे. मात्रराष्ट्रवादीचे मनसुबे काही वेगळेच आहेत. यापूर्वी आघाडीसाठी असलेल्या जागा वाटपाचे सुत्र बदलून आता फिप्टी-फिप्टी अशा मानसिकतेमध्ये राष्ट्रवादी  काँग्रेस आली असून, जागा अदलाबदलीमध्ये पश्चीम विदर्भातील अकोला, वाशिम -यवतमाळ या दोन लोकसभा मतदारसंघावरराष्ट्रवादी चा डोळा असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी काँग्रेसकडे असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघावरचा राष्ट्रवादीचा दावा कायम असला, तरी ऐनवेळी हा मतदारसंघ काँग्रेस किंवा मित्रपक्षाला सोडण्याची शक्यताही सुत्रांनी व्यक्त केल्यामुळे पश्चिम वºहाडातील राजकीय गणीते नव्याने मांडावी लागणार आहेत.
आघाडीच्या जागा वाटपात अकोला व वाशीम-यवतमाळ हे दोन लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे, तर बुलडाणा हा मतदार राष्ट्रवादी  काँग्रेसच्या वाटयाला आलेला आहे. या तिन्ही मतदारसंघात आघाडीने सपाटून मार खाल्ला आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत आहे . ते मतदारसंघ राष्ट्रवादी ने घ्यावेत असा सुर मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी च्या बैठकीत समोर आला आहे. या सुत्रानुसार पश्चिम वºहाडातील अकोला व वाशीम-यवतमाळ हे दोन मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या अजेंडावर आहेत. अकोल्यात १९८४ पासून सातत्यान काँग्रेसचा पराभव होत आहे. स्व.नानासाहेब वैराळे हे १९८४ मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे शेवटचे खासदार त्यानंतर या मतदारसंघावर भाजपाने निर्माण केलेले वर्चस्व काँग्रेसला स्वबळावर मोडून काढता आले नाही. १९९८ व १९९९ या लागोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेलसा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन भाजपाला सहा वर्ष थांबविण्यात यश आले; मात्र अ‍ॅड.आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाने ताब्यात घेत आपले वर्चस्व केले असून, सध्या याच मतदारसंघात काँग्रेसला लोकसभेसाठी प्रभावी ‘चेहरा’ सापडणे ही कठीण झाले आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी  काँग्रेसने या मतदारसंघावर दावा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसला एमआयएम वगळून आंबेडकर हवे आहेत, तर राष्ट्रवादी  वगळून काँग्रेससोबत आघाडी करण्यास आंबेडकरांची पसंती आहे. काँग्रेसकडे सक्षम उमदेवार नसल्यामुळे राष्टÑवादीने अकोल्यातील डॉ.अभय पाटील यांना रिंगणात उतरिवण्याची तयारी सुरू केली आहे, अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात डॉ.पाटील हे राष्टÑवादीच्या व्यासपिठावर कधी दिसले नाही; मात्र राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत त्यांच्या बैठका झालेल्याचे अनेकदा माध्यमांमध्ये आले आहे. त्यामुळेच कदाचीत डॉ.पाटील यांनी अकोल्यात आपली सक्रीयता वाढविली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत दावेदारांची प्रचंड मोठी यादी असली, तरी सर्वांचेच लक्ष्य विधानसभेकडेच आहे. या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी नवा उमेदवार देण्याची खेळी करण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती वाशिम-यवतमाळ मध्ये आहे. सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त करीत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी आपले वर्चस्व या मतदारसंघावर निर्माण केले आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यात काँग्रेसचे दिग्गज म्हणून ओळखल्या जाणारे माणीकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, प्रा.वसंतराव पुरके आदी नेत्यांना सातत्याने अपयश आले आहे. एकीकडे सेनेला रोखता येत नाही अन् दूसरीकडे काँग्रेस अंतर्गत गटबाजी थांबविता येत नाही अशी स्थिती या नेत्यांची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या मतदारसंघावरचा दावा प्रबळ केला आहे. शिवसेनेतही ना.संजय राठोड व खा.भावना गवळी यांच्यातील गटबाजी वाढतीच असल्याने त्याचा फायदा उचलत राष्ट्रवादी तयारीला लागली आहे. माजी मंत्री मनोहरराव नाईक, सुभाष ठकारे या दोघांच्या नावाची चर्चा आतापासूनपच सुरू झाली आहे.पश्चीम विदर्भातील तीन पैकी दोन मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा असून जागा वाटपात बुलडाण्याची जागा ही राष्ट्रवादी कडेच होती. ती कायम राहिली तर पश्चिम विदर्भात काँग्रेसला मतदारसंघच राहणार नाही असे चित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे वाशीम-यवतमाळची जागार काँग्रेस सहजासहजी देणार नाही अशा स्थितीत अकोला व बुलडाण्याची अदलाबदल होण्याची शक्यता अधीक आहे. बुलडाण्यात माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे एकमेव हुकमाचे पान राष्ट्रवादी कडे आहे. राष्ट्रवादी कडून ते लोकसभेचे पहिले उमेदवार होते.त्यांना पराभव पत्कारावा लागला, तर दूसºयांदा कृष्णराव इंगळे यांना सेनेने मात दिली. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसही दावा करीत आहे. दूसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी  काँग्रेस आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली, तर येथे स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्या नावाची घोषणा आधीच स्वाभिमानीचे संस्थापक खा.राजु शेटटी यांनी केली आहे. या सर्व पश्चिम विदर्भातील तीनही लोकसभा मतदारसंघाच्या अदलाबदलीचे राजकारणा सध्या तेजीत आहे. काँगे्रसची सध्याची स्थिती पाहता राष्ट्रवादी या मतदारसंघासाठी आक्रमक असल्याने आघाडीसाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये राष्ट्रवादी चा दावा मोठा अडसर ठरण्याचीच चिन्हे आहेत.

Web Title: in Western Vidarbha Nationalist congress is in aggressive mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.