आमिर खानची मुलगी इरा खानला मिळाला आणखी एक करिअर ऑप्शन, फोटो शेअर करत चाहत्यांनाच विचारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 03:24 PM2020-10-07T15:24:59+5:302020-10-07T15:29:05+5:30
इरा ही आमिर आणि पहिली पत्नी रीना दत्तची मुलगी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इरा खानने Euripiedes’ Medea नावाचं एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. वेगळ्या धाटणीच्या नाटकाचं रंगभूमीवर विशेष कौतुकही झालं होतं.
आमिर खानची मुलगी इरा खानची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. लॉकडाऊन दरम्यान इराने बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लक्ष वेधून घेतले होते. तिने अभिनयात नाही तर दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. या व्यतिरिक्तही ती आणखी काही रंजक काम करण्यात बिझी असल्याचा तिचा एक फोटो समोर आला आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती टॅटू बनवताना पाहायला मिळते आहे.इराने तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात ती टॅटू डिझायनिंग आणि टॅटू बनवत असल्याचे पाहायला मिळतंय.
इराने काढलेला हा पहिला टॅटू असून तिच्या मित्राच्या हातावर डिझाइन केला आहे. इराने फोटो शेअर करत खास कॅप्शनही दिले आहे. 'फ्यूचर टॅटूअर' म्हणत मला वाटते की, टॅटू डिझायनिंग हा ही माझ्यासाठी एक चांगला करिअर ऑप्शन असू शकतो. इराकडून टॅटू काढून घेण्यासाठी तिचा मित्रही तयार झाला. त्यामुळे तिने तिच्या या खास मित्राचे आभारही मानले आहेत.
इरा ही आमिर आणि पहिली पत्नी रीना दत्तची मुलगी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इरा खानने Euripiedes’ Medea नावाचं एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. वेगळ्या धाटणीच्या नाटकाचं रंगभूमीवर विशेष कौतुकही झालं होतं. सोशल मीडियावरही इरा सक्रिय असते. इरा खानचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या फोटोंनाही चाहते कमेंटस आणि लाईक्स देत पसंती देत असतात.
एका मुलाखतीत आमिरला मुलगी इराविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. मुलगी इरा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का? यासंबधी प्रश्न होता. मात्र तिला कशात करिअर घडवायचं आहे हे मला माहिती नाही. तिचा कल हा चित्रपट निर्मितीकडे आणि दिग्दर्शनाकडे अधिक असल्याचं आमिरनं मुलाखतीत स्पष्ट केलं होते.
आमिरचा मुलगा जुनेद खानही अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा विचार करत आहे. मात्र जुनेदनं स्वत:च्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये यावं असं आमिरनं स्पष्ट केलं. आमिर लवकरच 'फॉरेस्ट ग्रम्प' च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' असं चित्रपटाचं नाव असणार आहे.