गोविंदाला होती जेम्स कॅमेरूनच्या Avatar ची ऑफर, 'या' कारणामुळे सारं काही फिस्कटलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 14:31 IST2022-12-21T14:28:36+5:302022-12-21T14:31:52+5:30
'अवतार' मध्ये मुख्य भुमिकेसाठी अभिनेता गोविंदाला ऑफर देण्यात आली होती. मात्र गोविंदाने चक्क ती ऑफर नाकारली.

गोविंदाला होती जेम्स कॅमेरूनच्या Avatar ची ऑफर, 'या' कारणामुळे सारं काही फिस्कटलं...
२००९ मध्ये आलेला 'अवतार' (Avatar) जगातला सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. तब्बल तेरा वर्षांनी अवतारचा दुसरा भाग आला आहे. या भागानेही तुफान कमाई केली आहे. पण तुम्हाला माहितीए का अवतार मध्ये मुख्य भुमिकेसाठी अभिनेता गोविंदाला ऑफर देण्यात आली होती. मात्र गोविंदाने चक्क ती ऑफर नाकारली.
गोविंदा आज ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याची एक मुलाखत व्हायरल होत आहे. 'आप की अदालत'ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने एक मोठा खुलासा केला आहे. पत्रकाराने गोविंदाला विचारलं, 'तू एका मोठ्या हॉलिवुड सिनेमाची ऑफर नाकारली होती का ?' त्यावर गोविंदा म्हणतो, 'हो, अवतार सिनेमाची ऑफर मला आली होती. त्याचं तर टायटलही मीच दिलं होतं. अवतार सुपरहिट होईल असंही मी सांगितलं होतं. मात्र शरीरावर निळा रंग लावायचा हे काही मला जमणार नव्हतं आणि मी चित्रपटाला नकार दिला. पण मी म्हणलं तसं २००९ ला सिनेमा आला आणि तो सुपरहिट झाला.'
निळा रंग लावणार नाही म्हणून गोविंदा एका ब्लॉकबस्टर सिनेमाला मुकला. नाहीतर हॉलिवुडच्या या बिग बजेट चित्रपटात मुख्य भुमिकेत एक बॉलिवुड कलाकार असला असता.