'ती आत्महत्या करुच शकत नाही', कमल सदानाचा खुलासा; दिव्या भारतीसोबत केलं होतं काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:04 IST2024-04-13T13:04:01+5:302024-04-13T13:04:38+5:30
दिव्या भारतीच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच कमल सदानांनी तिच्यासोबत शूटिंग केलं होतं.

'ती आत्महत्या करुच शकत नाही', कमल सदानाचा खुलासा; दिव्या भारतीसोबत केलं होतं काम
अभिनेत्री दिव्या भारतीच्या (Divya Bharti) ट्रॅजिक आयुष्याबद्दल तर सर्वांनाच ठाऊक आहे. इतक्या सुंदर आणि गुणी अभिनेत्रीचा दुर्देवाने खूपच कमी वयात मृत्यू झाला. दिव्या भारतीच्यामृत्यूचं गूढ आजही उलगडलेलं नाही. वेगवेगळ्या गोष्टी याबाबत आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता कमल सदानाने नुकत्याच एका मुलाखतीत काही दावे केले आहेत.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कमल सदाना म्हणाले, "दिव्या भारतीच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप वाईट वाटलं होतं. ती प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली. ती श्रीदेवी यांची मिमिक्री करायची. तिच्या निधनाबद्दल कळताच मला खूप धक्का बसला होता. कारण तिच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीच आम्ही शूटिंग पूर्ण केलं होतं. जेव्हा मला कळलं तेव्हा वाटलं की असं कसं होऊ शकतं?"
ते पुढे म्हणाले, "तेव्हा दिव्याकडे सिनेमांची रांग असायची. ती नेक्स्ट जनरेशन सुपरस्टार होती. मला वाटतं की तिने थोडी ड्रिंक घेतली होती. ती मस्ती करत होती आणि कदाचित तेव्हाच तिचा पाय घसरला. मला वाटतं हा फक्त एक अपघात होता. काही दिवसांपूर्वी शूटिंग करताना तर ती एकदम ठीक होती. तिला कोणत्याच अडचणी नव्हत्या."
दिव्या भारतीने 'दिवाना', 'विश्वात्मा', 'शोला और शबनम' सारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. खूप कमी वयात तिने इतकं यश मिळवलं होतं. 1993 साली तिचं निधन झालं. तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती.