Shilpa Shetty : पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली रिअॅक्शन, झालीय अशी स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 08:31 AM2021-07-23T08:31:34+5:302021-07-23T08:31:54+5:30
शिल्पा शेट्टीने गुरुवारी रात्री, इंस्टाग्राम स्टोरीवर एका पुस्तकाच्या पानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या पोस्टमध्ये जेम्स थर्बरच्या उद्धरणावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सध्या बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी खासगी आयुष्यात अत्यंत वाईट फेजमधून जात आहे. अशात पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच या मुद्द्यावर मौन सोडत रिअॅक्ट केले आहे. यासाठी शिल्पाने सोशल मिडियाचा सहारा घेतला आहे. शिल्पा सोशल मिडियावरवर जबरदस्त अॅक्टिव्ह असते. मात्र, पती राज कुंद्राच्या अटकेनंतर तिने प्लेटफॉर्मपासून थोडे अंतरच ठेवले होते. (Actress Shilpa shetty first post after husband raj kundra arrest in pornography case goes viral)
शिल्पा शेट्टीची पोस्ट -
शिल्पा शेट्टीने गुरुवारी रात्री, इंस्टाग्राम स्टोरीवर एका पुस्तकाच्या पानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या पोस्टमध्ये जेम्स थर्बरच्या उद्धरणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात लिहिले आहे, "रागात मागे पाहू नका अथवा भीतीने समोर पाहू नका, त्याऐवजी जागरूकतेनं पाहा."
यापुढे लिहिण्याता आले आहे, "आपण रागात, ज्या लोकांनी आपल्याला दुखावले आहे, जी निराशा आपण अनुभवली आहे, जे दुर्दैव आपण सहन केले आहे, यांकडे मागे वळून पाहतो. आपण अशा शक्यतांना घाबरतो, की आपली नोकरी जाऊ शकते, आजार होऊ शकतो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आपल्याला ज्या ठिकाणी राहण्याची गरज आहे, ते हेच आहे. आता - काय झाले आहे किंवा काय होऊ शकते याकडे चिंताग्रस्त होऊन पाहू नका, पण काय आहे याची जाणीव असू द्या."
पोस्टमध्ये पुढे आहे, "मी जिवंत राहण्यासाठी भाग्यशाली आहे, हे जाणून, मी दीर्घ श्वास घेतो. मी भूतकाळात आव्हानांचा सामना केला आहे आणि भविष्यातही मी आव्हानांचा सामना करू शकतो. आज मला माझे जीवन जगण्यापासून विचलित करण्याची आहीही आवश्यकता नाही."
शिल्पाने पुस्तकातील हे पान शेअर करताना काहीही लिहिलेले नाही. मात्र, सध्यस्थितीत शिल्पा कशा प्रकारे स्वतःला सांभाळत आहे, हे समजते. तत्पूर्वी बॉलीवुड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती बिझनेसमन राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अॅपच्या सहाय्याने रिलीज करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.